Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

HomeBreaking Newsपुणे

Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

Ganesh Kumar Mule Sep 10, 2022 11:25 AM

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!
Sinhagad Road Traffic Diversion | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल
Ganesh immersion tanks | PMC Pune | गणराया महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना सदबुद्धी दे | विवेक वेलणकर

विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!

| स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल

 | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

 पुणे.  गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरात मोठी धामधूम सुरू आहे.  मात्र हा आवाज करत असताना निसर्गाची काळजी गणेश मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात नाही.  याचा लोकांना फक्त त्रास होतो.  विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या 21 वर्षांपासून पुण्यातील रहिवासी ध्वनिप्रदूषणाने हैराण झाले आहेत.  गेल्या वर्षीच्या विसर्जनात ध्वनी प्रदूषणाची पातळी थोडी कमी झाल्याचे दिसून होती. कारण कोरोनामुळे १९ वर्षांतील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण आढळून आले होते. गेल्या वर्षातील सरासरी आवाज 59.8 डेसिबल होता.  यंदा मात्र हा आवाज दुपटीने वाढून 105.2 डेसिबल झाला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील नागरिकांचे गेल्या दोन दिवसापासून जगणे मुश्किल झाले आहे. डीजे आणि ढोल ताशाच्या आवाजाने नागरिक मेटाकुटीला आले. सीईओपी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हे मूल्यांकन केले आहे.

  – आवाजाचे मापन मुख्य 10 चौकांमध्ये केले जाते

 दरवर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख 10 चौकांचे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी सीईओपी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सरावा केला जातो.  यामध्ये बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबर्या गणपती चौक, भाऊसाहेब गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, खंडूजीबाबा चौक अशा चौकांचा समावेश आहे.  या संदर्भात महाविद्यालयाच्या उपयोजित विज्ञान विभागाच्या पर्यावरण विज्ञान संशोधन केंद्राचे डॉ.महेश शिंदीकर म्हणाले की, महाविद्यालयाकडून गेल्या 22 वर्षांपासून हे काम केले जात आहे.  चालू वर्षातही कॉलेजचे कौतुक झाले.  त्यानुसार अनेक प्रकरणे समोर येत आहेत.  लक्ष्मी रोडवर यंदा आवाजाच्या तीव्रतेने कहर केला आहे.  लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र दिवस रात्रीच्या नियमातील सरासरीपेक्षा हा आवाज दुपटीने ओलांडला गेला. दोन दिवस येथील वातावरण अतिशय असह्य होते, असे मत स्थानिक रहिवाश्यानी नोंदवले.

 – आवाज वाढीस प्रशासनाचे नरमाईचे धोरण कारणीभूत

 डॉ.शिंदीकर यांच्या मते ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे.  यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनीही यात मोलाचे सहकार्य केले.  मात्र असे असले तरी प्रशासनाच्या नरमाईच्या धोरणामुळे हा आवाज वाढला आहे. असे मत शिंदीकर यांनी व्यक्त केले. निरीक्षणानुसार विसर्जनात आवाजाची सर्वात कमी पातळी 9 सप्टेंबर ला सायंकाळी 4 वाजता म्हणजे 64 डेसिबल नोंदवली गेली. तर सर्वाधिक आवाज 10 सप्टेंबर ला सकाळी आठ नंतर खंडूजी बाबा चौकात 128.5 (अति धोकादायक) नोंदवला गेला.
या उपक्रमात यावर्षी विद्यार्थी स्वयंसेवक सुयोग लोखंडे, जयवंत नांदोडे, तन्मय पाठक, सर्वेश कोळेकर, शिवकुमार वारकड, योगेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष मोजणीत सहभाग घेतला तर आकडेवारीचा निष्कर्ष काढण्यासाठी अंकिता महाजन, गौरी जाधव, अनुष्का पाटील, स्नेहल गुडल, श्रेया इंगळे, शिल्पा मांदळे, जयश्री मिसाळ यांनी सहकार्य केले. तर माजी विद्यार्थी विनीत, आदित्य लंके, युवराज चव्हाण, मनोज राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

 – आवाज पातळी अशी आहे?

 वर्ष.            आवाज पातळी (डेसिबल)
 2008       101.4
 2010      100.9
 2012.     104.2
 2013.     109.3
 2016.      92.6
 2018.     90.4
 2019.      86.2
 2020.      59.8
2022.       102.5