PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती   | विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

HomeपुणेBreaking News

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती | विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

Ganesh Kumar Mule Sep 26, 2023 12:56 PM

Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज
Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!
Ganesh Utsav | ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती

 

| विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती

 

PMC Care | पुणे |  पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) नव्या स्वरूपातील सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म PMC CARE नागरिकाभिमुख सेवा प्रदान करतो. त्यात सिटी अपडेट्स, ऑनलाईन मनपा सेवा, आसपासच्या डील्स आणि अजून बरेच काही उपलब्ध आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका (PMC Pune) सज्ज झाली आहे. महापालिकेच्या PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जनाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

PMC CARE या सिटीझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मवर गणेशोत्सवाविषयी ब्लॉग्स, लेख नागरिक वाचू शकतात. तसेच गणेश विसर्जनाविषयी माहिती देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲप आणि पोर्टलच्या ‘माझ्या जवळ‘ या टॅबवर क्लिक केले की, नागरिक आपल्या जवळपासचे विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्र, गणेश मंडळे, पार्किंगची जागा, बंद रस्ते, पर्यायी मार्गांविषयी माहिती मिळवू शकतात. या यादीतील एखाद्या ठिकाणाला क्लिक केले की, आपल्याला त्या ठिकाणी कसे पोहोचायचे यासाठी मॅप देखील दिसतो. अशा प्रकारे पुणेकर नागरिक ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील. त्यासाठी मात्र हे PMC CARE ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक आहे. नागरिक त्यासाठी पुढील लिंकचा वापर करून ॲप डाउनलोड करू शकतात.

 

गूगल प्ले स्टोअरसाठी लिंक –  https://fxurl.co/rFshd 

iOS ॲपल ॲपसाठी लिंक – https://fxurl.co/4IJJ123