Pune Solapur Highway | बंद झालेल्या टोलनाक्याचे अवशेष काढण्याची विवेक वेलणकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

HomeBreaking News

Pune Solapur Highway | बंद झालेल्या टोलनाक्याचे अवशेष काढण्याची विवेक वेलणकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Aug 20, 2024 12:09 PM

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा
organic farm produce | सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिका ओटे उपलब्ध करून देणार 
PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाला वसुलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी!

Pune Solapur Highway | बंद झालेल्या टोलनाक्याचे अवशेष काढण्याची विवेक वेलणकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

 

 

Pune Solapur Highway Toll -(The Karbhari News Service) – पुणे सोलापूर रस्त्यावरील हडपसर व यवत येथील जुन्या बंद झालेल्या टोलनाक्याचे अवशेष काढण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. (Pune News)

वेलणकर यांच्या निवेदनानुसार पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर तसेच यवत येथे पूर्वी टोल नाके होते. हे दोन्ही टोल बंद होऊन काही वर्षे झाली आहेत. तरीही तिथले टोल नाक्यांचे भग्नावशेष रस्त्यावरील अडथळा ठरत आहेत. तसेच या टोलनाक्यांवर घातलेले स्पीड ब्रेकर ही वाहतूक कोंडीस कारणीभूत होऊन रोज हजारो वाहनांचे इंधन व वेळ वाया घालवत आहेत.

वेलणकर यांनी पालकमंत्र्याना म्हटले आहे कि,  संबंधित शासकीय यंत्रणेस आदेश देऊन हे टोलनाक्यांचे भग्नावशेष व स्पीड ब्रेकर्स काढून टाकून रस्ता डांबरीकरण करुन सुस्थितीत करावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0