Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

Homeadministrative

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

Ganesh Kumar Mule Oct 31, 2025 7:15 PM

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
Ruby Hall Clinic | रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन
Ayodhya tour | Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार? 

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुण्यात प्रथमच राष्ट्रीय एकता दौड (‘रन फॉर युनिटी’) अंतर्गत ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. हा सार्वजनिक क्रीडा सोहळा रविवार, २ नोव्हेंबर रोजी स. प. महाविद्यालय, पुणे येथून सुरू होईल. (Run For Unity)

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून देशभरात साजरी केली जाते आणि त्यानिमित्तानेच ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी सरदार पटेल यांची ही १५० वी जयंती असणार आहे.

पुणे शहरासाठी ऐतिहासिक असणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजल्यापासून पुणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पहाटे ३ ते पहाटे ६ वाजेपर्यंत दोन्ही मार्गिकांवर (पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेल. त्यानंतर पहाटे ६ वाजेनंतर रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहील.

पुणे मेट्रोच्या या व्यवस्थेमुळे नागरिकांना महामॅरेथॉनच्या सुरुवातीच्या ठिकाणी वेळेवर, सोयीस्करपणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पोहोचणे शक्य होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: