Pune RMC Plants | पुणे महापालिकेकडून 7 RMC प्लांट वर कारवाई 

Homeadministrative

Pune RMC Plants | पुणे महापालिकेकडून 7 RMC प्लांट वर कारवाई 

Ganesh Kumar Mule Apr 15, 2026 8:29 PM

Pune PMC News | जंगली महाराज रोड व फर्ग्युसन रोडवर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई!
Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई
PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!

Pune RMC Plants | पुणे महापालिकेकडून 7 RMC प्लांट वर कारवाई

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – १५ एप्रिल रोजी पहाटे २  वाजता पुणे पेठ लोहगाव खांदवे नगर, महालक्ष्मी लॉन्स परिसर, येथील ७  RMC प्लांट जमीनदोस्त करणेत आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Encroachment)

 

महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार पवनीत कौर अतिरिक्त महापालिका आयुक्त, सोमनाथ बनकर, उप आयुक्त, अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, यांच्या नियंत्रणाखाली बुधवार ६ रोजी पहाटे 2 वाजता पुणे पेठ लोहगाव खांदवे नगर, महालक्ष्मी लॉन्स परिसर, येथील 7 RMC प्लांट जमीनदोस्त करणेत आले. खराडी ईऑन आयटी.पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निर्मुलनाची कारवाई करण्यात आली.

कारवाईत एकूण ५२,२५० चौरस फूट अनधिकृत कच्चे/पक्के शेड /बांधकाम निष्कासित करण्यात आले. या केलेल्या कारवाई मुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सदर कारवाई करिता एम.एस.एफ.जवान-७५, जेसीबी-१६, गॅसकटर-०५ , ब्रेकर-०२, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक:-३०, बिगारी सेवक:-८५ यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: