PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई 

HomeपुणेBreaking News

PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई 

गणेश मुळे Feb 07, 2024 1:40 PM

PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!
PMC IWMS | महापालिकेच्या कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार | शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची माहिती
Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा! 

PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई

 

PMC Illegal Construction Action | बिबवेवाडी परिसरातील हिल टॉप हिल स्लोप (Hill top hill slope bibvewadi) मध्ये येणाऱ्या अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने अखेर बुधवार  रोजी कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने २९ अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Pune Municipal corporation latest news)

महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. (Pune pmc news)

बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City engineer prashant wagmare), मुख्य अभियंता युवराज देशमुख (Chief engineer yuvraj deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने सदर कारवाई योग्यरित्या पार पाडली.