Pune Property tax | शहरातील TOP 100 थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४ कोटी थकबाकी!
| महापालिकेच्या तिजोरीत आता पर्यंत २००५.५३ कोटी जमा
PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील TOP 100 थकबाकीदार मिळकत धारकांची (Defaulter’s) ३३४.१० कोटी इतकी थकबाकी आहे. त्याची यादीच महापालिका मिळकत कर विभागाने (PMC Property Tax Department) जाहीर केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ९,२९,७७१ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर २००५.५३ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. असा इशारा उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकबाकी वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित केलेले आहे. त्या अनुषंगाने २/१२/२०२४ पासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले स्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार २/१२/२०२४ ते ०४/०२/२०२५ या चौपन्न दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे ८२५ इतक्या मिळकतींना भेट देण्यात येवून रक्कम १८६ कोटी ५४ लाख ८२ हजार ६७४ इतक्या रकमेचा कर वसुल करण्यात आलेला आहे. तसेच १५० इतक्या मिळकती सीलबंद करण्यात आलेल्या आहेत. असे माधव जगताप यांनी सांगितले.
मिळकत कर थकबाकी पोटी २० नळजोड कनेक्शन तोडनेची कारवाई करण्यात आली आहे. शहरात वसुलीकरिता व्याप्ती वाढविणेत येत असून आणखी १० टिम नळ कनेक्शन बंद करणेसाठी नियुक्त करणेत येत आहेत.
तसेच सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांची संपूर्ण पुणे शहर हद्दीमधील एकूण १२८ मिळकती असून त्यांची थकबाकी एकूण ३४५ कोटी एवढी आहे. परंतु कोंढवा बु., आंबेगाव बु., एरंडवणे या मिळकती व्यतिरिक्त इतर सर्व मिळकतीवर ‘NO COERCIVE ACTION ‘ असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे एरंडवणे येथील मिळकतीवर थकबाकी रक्कम रु. ४७,४३,१८,३०३/- (सत्तेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार तीनशे तीन रुपये, एवढी असल्याने मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे नियम ४२ नुसार जप्तीची कारवाई ०६/१२/२०२४ रोजी करण्यात आली.
तसेच यापूर्वी देखील केलेली जप्तीची कारवाई योग्य असून तात्काळ १२ कोटी इतकी रक्कम भरणेबाबत न्यायलयाने आदेशित केले होते. तरी देखील सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी कर न भरल्याने ‘CONTEMPT OF COURT PITITION’ दाखल आहे.
तसेच पुणे शहरातील एकूण ४३८ शासकीय मिळकतींची ९३.२४ कोटी इतकी थकबाकी आहे. याबाबत सदरची थकबाकी वसूल करणेबाबत शासकीय मिळकत धारकांकडे पाठपुरावा सुरु आहे. असे जगताप यांनी सांगितले.
COMMENTS