Pune Property Tax PT 3 | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा

Homeadministrative

Pune Property Tax PT 3 | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा

Ganesh Kumar Mule May 30, 2025 9:27 PM

PMC Property Tax Department is planning to auction 200 sealed commercial properties
PMC Property Tax Lottery Award | 45 पुणेकरांना पुणे महापालिका उद्या देणार बक्षिसे 
Pune Property Tax | सवलतीत मिळकत कर भरण्याचा कालावधी ७ जुलै पर्यंत वाढवला | सर्व्हर डाऊन झाल्याने कर भरण्यात नागरिकांना अडचणी 

Pune Property Tax PT 3 | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा

 

Pune Property Tax – (The Karbhari News Service) – पीटी-३ फॉर्म (PMC PT 3 Application) भरलेल्या मिळकतधारकांच्या मिळकत करातील सवलतीवरून शिवसेना (UBT)  नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar Pune)  यांनी मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ (Avinash Sapkal PMC) यांना आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Pune Municipal Corporation Property tax Department)

सुतार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि,  पुणे मनपाच्या टॅक्स विभागकडून मिळकतधारकांना ४०% मिळकतकरामध्ये सवलत दिली जात होती. ती सवलत मिळण्यासाठी पीटी-३ फॉर्म भरून देण्याबाबत मनपाने आपल्या विभागाकडून सांगण्यात आले. त्या प्रमाणे लाखो पुणेकरानी पीटी-३ फॉर्म भरून दिले परंतु त्याची कोणतीही शहनिशा न करता २०२५-२६ च्या मिळकतकरामध्ये त्या मिळकतधारकांना ४०% सवलत न देता बिले देण्यात आली.  हा पुणेकरावर अन्याय आहे. आपण त्वरीत पीटी-३ फॉर्म भरलेल्या मिळकतधारकांना प्रत्येक क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत एक कक्ष सुरू करून, त्या ठिकाणी पीटी-३ फॉर्म भरलेल्या मिळकतधारकांना त्वरीत दुरुस्तीची बिले देण्याची सुविधा उपलब्ध करून दयावी. अन्यथा आम्हाला आपल्या कक्षामध्ये आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: