Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

कॉंग्रेस चे  प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशअध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राउत यांच्या उपस्थितीत साळवे यांचा पक्षप्रवेश.

HomeBreaking News

Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Ganesh Kumar Mule Aug 09, 2024 9:37 PM

Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 
Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!
PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 

Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Avinash Salve Pune Congress – (The Karbhari News Service) – शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांनी आज मुंबई येथे कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. तब्बल चारवेळा नगरसेवक आणि एकवेळ महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भुषविलेल्या साळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. (Vidhansabha Election 2024)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात कॉंग्रेस चे  प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशअध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राउत यांच्या उपस्थितीत साळवे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील उपस्थित होते. साळवे हे २०१७ मध्ये येरवडा प्रभागातून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. तत्पुर्वी ते तीनवेळा रिपाइं कडून महापालिकेवर विजयी झाले होते. तर एकदा त्यांनी कॉंग्रेसकडूनही निवडणूक लढविली होती. १९९२ पासून काही काळ वगळता सातत्याने महापालिकेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. (Pune News)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0