Pune PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या १३१ कर्मचारी व अधिकारी यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणगौरव!

Homeadministrative

Pune PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या १३१ कर्मचारी व अधिकारी यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणगौरव!

Ganesh Kumar Mule Aug 16, 2025 6:56 PM

CM Devendra Fadnavis | येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले एकूण १० निर्णय जाणून घ्या 
Bank holidays list January 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 11 दिवस बँका बंद राहतील |  संपूर्ण यादी पहा

Pune PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या १३१ कर्मचारी व अधिकारी यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणगौरव!

| स्वारगेट मुख्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML Swarget)  स्वारगेट मुख्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे (Pankaj Devare CMD PMPML) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत (Asha Raut PMPML CEO) यांची प्रमुख उपस्थिती होती. (79th Independence Day)

स्वातंत्र्य दिनानिमित्त, परिवहन महामंडळातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या अंतर्गत, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील १७ आगारांमधून उत्कृष्ट चालक, उत्कृष्ट वाहक, उत्कृष्ट क्लर्क, उत्कृष्ट यंत्रशाळा कर्मचारी, उत्कृष्ट चेकर टीम, उत्कृष्ट आगार व्यवस्थापक, उत्कृष्ट आगार अभियंता तसेच विविध पदांवरील कर्मचारी यांची निवड करून त्यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावर्षी एकूण १३१ अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, आगार व्यवस्थापक, आगार अभियंता तसेच कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0