Pune PMC Property tax Discount | सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ!    |  प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा निर्णय 

HomeBreaking Newsपुणे

Pune PMC Property tax Discount | सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ!  |  प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा निर्णय 

गणेश मुळे May 30, 2024 2:13 PM

Pune Municipal Corporation Tax Due Details | 1 कोटींपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या फक्त 1746 बड्या लोकांनी महापालिकेचे 5182 कोटीं थकवले 
The process of distribution of 12 lakh property tax bills to Pune residents has started!
  15 days extension for citizens to pay property tax at discount!  |   Decision of PMC Property Tax Department

Pune PMC Property tax Discount | सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ!

|  प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा निर्णय

PMC Pune Property tax Discount – (The Karbhari News Service) – आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत  मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५% व १०% इतकी सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांकडे अवघा 1 दिवस उरला आहे. मात्र नागरिकांकडून मुदतवाढ देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यानुसार नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच नागरिक 15 जून पर्यंत मिळकतकर भरून सवलत मिळवू शकतात. त्यामुळे मिळकतधारकांनी याचा लाभ घेऊन मिळकत कर लवकरात लवकर भरावा. असे आवाहन उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडून करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation Property tax Department)
शहरातील नागरिक मिळकतकर भरताना ऑनलाईन पद्धत वापरतात. मात्र हे करत असताना महापालिकेच्या वेबसाईटला तांत्रिक अडचणी येत होत्या. तसेच 31 मे या दिवशी मुदत संपत असल्याने देखील वेबसाईटला तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे 15 दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation Property tax Department)

दरम्यान पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४.२२ लक्ष इतकी असून, सर्व मिळकतधारकांना भारतीय पोस्ट विभागामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची देयके पाठवण्यात आली आहेत. तरी, ज्या मिळकतधारकांना अद्याप देयके प्राप्त झाली नसतील, त्यांनी मिळकतकर विभागाच्या
propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपले देयक पाहू अथवा डाऊनलोड करू शकतात.

पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र ) शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीयसुट्टीच्या दिवशी देखील सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहणार असून, मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही, त्याऐवजी जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्द्तीने कर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन मिळकतकर भरण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, Amazon Pay, NEFT-RTGS, etc.