Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याचा संकल्प!

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याचा संकल्प!

Ganesh Kumar Mule Jun 17, 2025 7:11 PM

MHADA | पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत
MP Supriya Sule | आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम
Pune Airport | नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेचा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याचा संकल्प!

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या पुणे महानगरपालिकेने Urban95 अंतर्गत Nurturing Neighbourhoods 2.0 या उपक्रमांतर्गत बहु-क्षेत्रीय समविचार बैठकीचे आयोजन केले. यावेळी पुणे शहराला लहान मुलं व पालकांसाठी अनुकूल शहर बनवण्याच्या दृष्टीकोनाचे अनावरण करण्यात आले आणि कुटुंब-मित्र सार्वजनिक जागांसाठी डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

हा उपक्रम गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी मिशन आणि वॅन लियर फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि WRI इंडिया यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. यामध्ये बाल्यावस्थेच्या आरोग्यपूर्ण विकासाला आणि पालकांच्या कल्याणाला चालना देणाऱ्या समावेशक आणि लहान मुलांसाठी अनुकूल शहरी जागा निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.

पुणे शहरात प्रत्येक झोनमध्ये सुरक्षित, समावेशक आणि आकर्षक सार्वजनिक जागा व बालविकास केंद्रांमध्ये प्रवेश सुधारणे आणि वापरात नसलेल्या जागांचा पुनर्वापर करणे यावर भर देण्यात येत आहे. लहान मुलांचं आरोग्य त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि पालकांशी होणाऱ्या संवादावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन, शहर लहान मुलांकरिता केंद्रित सार्वजनिक जागा तयार करत आहे आणि त्याचबरोबर पालकांच्या देखील गरजा पूर्ण करणाऱ्या सेवा सक्षम करत आहे.

पुढे जाऊन, पुणे शहरात लहान मुलं आणि पालकांच्या कल्याणाला संस्थात्मक रूप देण्याचा उद्देश असून, त्यासाठी सकारात्मक पालकत्व पद्धती प्रोत्साहित करणे, सामाजिक व वर्तनात्मक बदल घडवणे आणि सार्वजनिक जागा समावेशक व सुरक्षित बनवणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी डेटा-आधारित नियोजन, अधिकाऱ्यांचे व फील्ड वर्कर्सचे प्रशिक्षण आणि समुदाय, NGO आणि नागरी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. कार्यशाळेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे सार्वजनिक जागांचे डिझाईन आणि अंमलबजावणीसाठी तांत्रिक आधार मिळणार आहे.

शहराचे बाल विकास अधिकारी विविध विभागीय समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. या समविचार बैठकीत विविध भागधारकांनी एकत्र येऊन रणनीती ठरवल्या व शहराच्या एकत्रित दृष्टीकोनासाठी रोडमॅप तयार केला. ४० हून अधिक सहभागी सदस्यांनी सहभागी उपक्रमांतून पुणेला ‘कुटुंब-मित्र’ शहर बनवण्यासाठी स्वतःची भूमिका जाणून घेतली.

पृथ्वीराज बी.पी.आयएएस, अतिरिक्त महापालिका आयुक्त,(इ) पुणे महानगरपालिका म्हणाले, “पुणे हे लहान मुलं आणि पालकांना केंद्रस्थानी ठेवून शहरी विकासाकडे पाहणाऱ्या भारतातील अगदी मोजक्या शहरांपैकी एक आहे. पुणे किड्स फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांनी आम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि आता Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत हे उपक्रम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि संस्था पातळीवर रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही कार्यशाळा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याचे आणि मार्ग ठरवण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरली आहे.”

अनुष्री पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक, सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्ट, WRI इंडिया म्हणाल्या, “ही कार्यशाळा पुण्यातील भागधारकांना सामाजिक व वर्तनात्मक बदलांसारख्या विविध उपाययोजनांची समज देण्यात उपयुक्त ठरली. सार्वजनिक जागांचा वापर लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबासाठी कसा वाढवता येईल हे ठरवण्यात मदत झाली. WRI इंडिया म्हणून आम्ही पुणे शहराला इतर शहरांसाठी आदर्श (Lighthouse) बनवण्यास पाठिंबा देत राहू. शहरांची रचना बाल्यावस्थेतील अनुभवांवर परिणाम करते यावर आमचा विश्वास आहे.”

आमिर पटेल, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, इंडिया, Urban95, Van Leer Foundation म्हणाले, “जीवनाची चांगली सुरुवात ही प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. त्यासाठी लहान मुलं व त्यांच्या पालकांचे आरोग्य व कल्याण महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये अशी सेवा व कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत जे पालकांसाठी आधारभूत वातावरण तयार करतील. भारतात Urban95 व Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत आम्ही शहर प्रशासन, नेते व चॅम्पियन्सना स्थानिक गरजांनुसार उपाययोजना विकसित करण्यासाठी पाठिंबा देत आहोत. पुणे या दृष्टिकोनाला मुख्य प्रवाहात आणील आणि NN 2.0 च्या माध्यमातून इतर शहरांसाठी उदाहरण बनेल अशी मला आशा आहे.”

ही समविचार बैठक पुणे शहराच्या ‘कुटुंब-मित्र’ शहर बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शासकीय विभाग, नागरी संस्था आणि WRI इंडिया यासारख्या तांत्रिक भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे शहरात लहान मुलांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी उपयुक्त अशा जागा निश्चितपणे विकसित होतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: