Pune PMC News | पुणे महापालिकेच्या 8 इंग्रजी माध्यम शाळांसाठी आयटीच मूव्हमेंट ला प्रति विद्यार्थी 29 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या 8 इंग्रजी माध्यम शाळांसाठी आयटीच मूव्हमेंट ला प्रति विद्यार्थी 29 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Aug 17, 2026 7:47 AM

Precautionary dose | महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर मोफत बूस्टर डोस ची सुविधा  | प्रिकॉशन डोस घेण्याचे महापालिकेचे आवाहन 
Pune Municipal Corporation | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे  54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!
Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या 8 इंग्रजी माध्यम शाळांसाठी आयटीच मूव्हमेंट ला प्रति विद्यार्थी 29 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव

महिला बाल कल्याण समितीसमोर प्रस्ताव, 2500 विद्यार्थ्यांना होणार फायदा

PMC English Medium Schools – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या 8 इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुढील 9 वर्षांसाठी आयटीच मूव्हमेंट या संस्थेकडे खर्च-सामायिक तत्वावर चालवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीसमोर ठेवण्यात आला आहे. (PMC Women and child welfare Committee)

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पत्रानुसार , सध्या PPP तत्वावर चालणाऱ्या या 8 शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 2293!विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2026-27 मध्ये विद्यार्थी संख्या सुमारे 2500 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

2015 पासून आयटीच मूव्हमेंट ही संस्था या शाळा चालवत आहे. आतापर्यंत संस्थेमार्फत CSR निधीतून शिक्षक, कर्मचारी वेतन, शैक्षणिक साहित्य आदी खर्च उचलला जात होता. 2025-26 साठी यासाठी सुमारे 14 कोटी रुपये खर्च झाले. मात्र पुढील वर्षांपासून CSR निधी उपलब्ध होणे अडचणीचे झाल्याने संस्थेने महापालिकेकडे निधीची मागणी केली आहे.

प्रस्तावानुसार 2026 ते 2035 या 9 वर्षांसाठी प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 29 हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सुरुवातीला संस्थेने 33 हजार रुपये दर मागितला होता, मात्र 30 मार्च 2026 रोजी झालेल्या चर्चेनंतर 29 हजार रुपयांवर सहमती झाली. या दरात CPI नुसार दरवर्षी वाढ केली जाणार आहे.

या 8 शाळांमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येवडा, संत गाडगे महाराज शाळा कोंढवा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा औंध, विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर, राजर्षी शाहू महाराज शाळा मुंढवा, पंडित दिनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड, आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ आणि समता अशोक विद्यामंदिर कर्वेनगर यांचा समावेश आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या इतर शाळांप्रमाणे गणवेश, शैक्षणिक साहित्यासाठी DBT चा लाभ दिला जाणार आहे. तसेच इमारत, वीज आणि इतर भौतिक सुविधा महापालिका पुरवणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 ब अन्वये आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा हा प्रस्ताव आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: