Pune PMC News | महापालिकेच्या या विभागातील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू!

Homeadministrative

Pune PMC News | महापालिकेच्या या विभागातील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू!

Ganesh Kumar Mule Mar 07, 2025 6:33 PM

Ryat Swabhimani Association | समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना
PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध! 
Garbage Project | आंबेगाव कचरा प्रकल्प लवकरच होणार सुरु | महापालिकेचा खर्च ही वाचणार

Pune PMC News | महापालिकेच्या या विभागातील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू!

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग जलोत्सरण विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ मधील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकार कडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग व जलोत्सारण विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ मधील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू करण्याबाबत प्रस्ताव महापालिका प्रशासन कडून शासनास पाठवण्यात आला होता. त्यानुषंगाने विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग व जलोत्सारण विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ मधील तांत्रिक कमर्चाऱ्यांना धोका भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत कर्मचारी संघटने कडून २०१६ पासून पाठपुरावा सुरू होता.

मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका यांनी ०२.०६.२०२३ रोजीच्या परिपत्रकान्वये विद्युत विभागामधील केवळ बत्तीवाला, बत्ती इन्सपेक्टर, असि. इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रिशन यांना धोका भत्ता लागू करण्यात आलेला आहे. तथापि, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचा प्रस्ताव व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५१(४) आणि त्या कलमाच्या स्पष्टीकरणातील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पाणी पुरवठा विभाग व जलोत्सारण विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ मधील तांत्रिक पदांना आणि विद्युत विभागातील (बिगारी, लिफ्टमन आणि इलेक्ट्रिक सुपरवायझर (विद्युत पर्यवेक्षक)) या पदांना दरमहा १००/- प्रमाणे धोका भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0