PMRDA Calendar | दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात

Homeadministrative

PMRDA Calendar | दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात

Ganesh Kumar Mule Mar 08, 2025 4:11 PM

Pune University Road | संचेती चौक ते पुणे विद्यापीठ रस्ता दुरुस्तीचे कामे सुरू | पीएमआरडीए महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार तातडीने कामे
Navale Bridge Traffic | नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी न‍िष्कासनाची कारवाई
PMRDA Pune | कामकाजाच्या सुलभतेसाठी PMRDA आयुक्तांनी घेतले महत्वपुर्ण न‍िर्णय!

PMRDA Calendar | दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीए पोहोचणार गावागावात

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा नाव‍िण्यपुर्ण उपक्रम

 

Pune PMRDA News – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) कार्यक्षेत्र व्यापक प्रमाणात असल्याने ग्रामस्तरावर कार्यालयाच्या कामकाजाच्या स्वरुपाची माहिती पोहोचावी, या उद्देशाने प्रथमच दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीची यंत्रणा ग्रामस्तरावर पोहोचणार आहे. या दिनदर्शिकेतून पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणाली, याबाबत माहिती दिल्याने स्थानिक पातळीवर नागरिकांना ती उपयुक्त ठरणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (Dr Yogesh Mhase IAS)  यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या माहितीयुक्त दिनदर्शिकेचे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयांसह यंत्रणेस वितरण करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सप्तसुत्री कार्यप्रणाली निश्चित केली असून त्यानुसार प्राधिकरणात कार्यवाही सुरू आहे. (Pune News)

पीएमआरडीएचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि नागरिकांची अधिकाधिक कामे ऑनलाइन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. पीएमआरडीएच्या कामकाजाबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रथमच सार्वजनिकरित्या पीएमआरडीएच्या या दिनदर्शिकेचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले होते. या दिनदर्शिकेत पीएमआरडीएच्या कामकाजाची रचना, स्वरूप, विभागनिहाय अपेक्षित माहिती द‍िलेली आहे. सोबत ईमेल आयडीसह संबंधित विभागाचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील द‍िलेला आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६९७ गावांचा समावेश असून संबंध‍ित ग्रामपंचायतींना दिनदर्शिका पाठव‍िण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीत पीएमआरडीएची कार्यप्रणाली पोहोचावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून ही उत्कृष्ट दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर विभागनिहाय कामकाजाची माहिती द‍िलेली आहे. संबंधित दिनदर्शिका ग्रामस्तरावर पोहोचावी, यासाठी ती पाठवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने गाव स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, ग्राम महसूल अध‍िकारी (तलाठी), सरपंच, पोलीस पाटील यांना दिनदर्शिकेच्या प्रती पाठविण्यात येत आहे.

सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र ग्रामपातळीपर्यंत असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या दिनदर्शिकेची मदत होणार आहे. आजही काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने त्यांच्यापर्यंत वेबसाईट, ऑनलाइन सुविधा पोहोचवणे अडचणीचे ठरते. त्यामुळे हा घटक विकास प्रक्रियेपासून लांब राहू नये, म्हणून त्यांना पीएमआरडीएची कार्यप्रणाली समजावी या उद्देशाने संबंध‍ित दिनदर्शिकेचे वाटप त्यांच्यापर्यंत करण्यात येत आहे.

दरमहा एका विभागाची माहिती
या दिनदर्शिकेत पीएमआरडीएने प्रत्येक विभागासंबंधी असलेली आवश्यक माहिती दिली आहे. यात १२ महिन्यांच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये तपशीलवार महिनानिहाय एका-एका विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीयुक्त दिनदर्शिकेच्या प्रती लोकप्रत‍िन‍िधी यांच्यासह शासकीय कार्यालयांना पण पाठव‍िण्यात येत आहे. संबंध‍ित दिनदर्शिकेच्या प्रती लोकप्रत‍िन‍िधी, महत्वाच्या शासकीय कार्यालयांसह अध‍िकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्या पाठव‍िण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0