Pune PMC News | समाविष्ट 9 गावांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर | सरकारने मागवल्या हरकती आणि सूचना
| हरकती नोंदवण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी
Merged Villages Draft DP – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या नऊ गावांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर केला आहे. हा आराखडा आता नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी खुला केला आहे. नागरिकंच्या हरकती व सूचनांसाठी ६० दिवसांचा कालावधी असून त्यानुसार विकास योजना नकाशा पुणे महानगरपालिकेमध्ये व सहायक संचालक नगररचना, पुणे शाखा पुणे या कार्यालयात नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municpal Corporation – PMC)
ऑक्टोबर 2017 साली ही गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेने याबाबत इरादा जाहीर करून काम सुरू केले होते. दरम्यानच्या काळामध्ये महानगरपालिकेची मुदत संपल्यामुळे आणि नवीन निवडणूक जाहीर न झाल्याने पुणे महानगरपालिकेने तयार केलेला संपूर्ण आराखडा मंजूरीच्या अभावी प्रतीक्षेत होता.नगर नियोजन अधिकाऱ्याने याबाबत तत्कालीन आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांनी तो पेंडिंग ठेवला.
शासनाकडे मुदतवाढ देखील मागितली होती. शासनाने तो आराखडा मुदतीत न केल्यामुळे कलम 162 अन्वये स्वतःकडे घेऊन सहाय्यक संचालक नगर रचना पुणे शाखा यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवला होता. त्यानी देखील मुदतवाढ मागितले होती. शासनाने आज हा प्रारूप विकास आराखडा मंजूर करून नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी खुला केला आहे.
प्रारूप विकास योजनेमध्ये एकूण ०९ गावांमध्ये सन २०२५ नुसार साधारतः ६ लक्ष इतकी लोकसंख्या असून नियोजनाच्या दृष्टीने सन २०३५ मधील एकूण ८.१ लक्ष इतकी लोकसंक्या विचारात घेऊन सोई सुविधा पुरवण्यासाठी वेगवेगळी आरक्षणे प्रस्तावित केली आहे. प्रारूप विकास योजनेखालील ०९ गावांमधील साधारणतः ५५०० हेक्टर इतक्या क्षेत्राचे नियोजन करताना ३७४ हेक्टर इतक्या क्षेत्रावर आरक्षणे प्रस्तावित केली आहे. म्हणजे एकूण क्षेत्राच्या अंदाजे ८% इतके क्षेत्र आरक्षणाखाली आहे. तसेच रस्ते व दळण वळणाखाली अंदाजे १५% इतके क्षेत्र आहे. शैक्षणिक सुविधा जसे प्रायमरी स्कूल, हाय स्कूल या आरक्षणानखाली एकूण ४१ हेक्टर इतके क्षेत्र आहे तसेच वैद्यकीय सुविधा जसे हॉस्पिटल, अर्बन हॅल्थ सेंटर इत्यादी खालील १८ हेक्टर इतक्या क्षेत्राची आरक्षणे प्रस्तावित आहे. खेळाचे मैदाने स्पोर्ट्स सेंटर इत्यादीखाली ७४ हेक्टर व गार्डन खालील ८८.१२हेक्टर इतके क्षेत्र आरक्षणाखाली सामाविष्ट आहे. एकूण ०९ गावांमधील लोकसंख्या वाढते नागरीकरण विचारात घेता एकूण ४२% इतके क्षेत्र रहीवास विभागात सामाविष्ट करण्यात आले आहे. सदर विकास योजनेत ४५ मी. ३६ मी. ३० मी. २४मी. व १८ मी. रुंदीचे मोठे रस्ते अस्तित्वातील विकास विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले असून वाहतूक व दळण वळणकरिता रस्त्यांचे जाळे सुयोग्य पद्धतीने आखण्यात आले आहे. सदरची विकास योजना GIS प्रणालीवर तयार करण्यात आली असल्याने अचूक व योग्य पद्धतीने तयार केली आहे. सदर प्रारूप विकास योजनेमध्ये SPONGE GARDEN ही आरक्षणे जलाशयालगत प्रस्तावित केली आहे सदरची आरक्षणे नैसर्गिक पद्धतीने पूर नियंत्रण व भूजल पातळी वाढविण्यासाठी मदतशीर राहतील तसेच PLAY GROUND, SPORTS CENTER, AUDOTORIUM ही सार्वजनिक सुविधा असलेली अशा स्वरुपाची आरक्षणे प्रस्तावित केली आहे. विकास योजना तयार करतान जागेवरील झालेली बांधकामे व अस्तितवातील रस्ते व पायाभूत सुविधा तसेच शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश, नियोजन मानांकने इत्यादी विचारात घेऊन सदर विकास योजना तयार करण्यात आली आहे व तिचे प्रसिद्धीकरण १६-१०-२०२५ रोजी शासन राजपत्रात करण्यात आली आहे.
- गावे आणि त्याचे क्षेत्रफळ

——–
बहुप्रतिक्षित आराखड्याच्या बाबत आता पुढील काळात शासनाने काय केले आहे याचा एक अभ्यास गट स्थापन करून शासनाने दिलेल्या विहित मुदतीत हरकती आणि सूचना नोंदवू या गावांच्यामध्ये देखील नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदवल्या पाहिजेत आणि नोंदवाव्यात असे आमचे आवाहन आहे. ही गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 1997 साली नियोजनाच्या दृष्टीने समाविष्ट केली होती. राजकीय कारणासाठी 2001 साली ही गावे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळली आणि पुन्हा एकदा 2017 साली ही गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली. नियोजनासाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती होती. मधल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये या भागामध्ये अनेक बांधकामे झाली असतील रिकाम्या जागा कमी प्रमाणात असतील आणि सर्वात महत्त्वाचे आरक्षणाच्या मानांकनाप्रमाणे या ठिकाणी होणाऱ्या नागरिकांना सामोरे कसे जायचे हा प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या आणि सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासमोर होता. पुन्हा एकदा शासनाचे आभार. काल त्यांनी नगररचना योजना मंजूर केली आणि आज गावांचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध केला.
- आपले पुणे

COMMENTS