Pune PMC News | उपायुक्त महेश पाटील यांची बदली | महापालिका सेवेतून करण्यात आले कार्यमुक्त
PMC Officers – (The Karbhari News Service) – उपायुक्त महेश पाटील यांची राज्य सरकारच्या वतीने अपर आयुक्त (महसूल), पुणे विभाग, पुणे या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाटील यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महेश भास्करराव पाटील, अपर जिल्हाधिकारी (गट-अ) यांची उप आयुक्त, पुणे महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने शासन आदेशान्वये नियुक्ती करण्यात आलेली होती.
महेश भास्करराव पाटील, अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) यांची संदर्भ क्र. ३ च्या आदेशान्वये अपर आयुक्त (महसूल), पुणे विभाग, पुणे या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुसार, पाटील यांनी ०९/०५/२०२५ रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करणेबाबतचा अर्ज महापालिका आयुक्त यांचेकडे सादर केले नुसार पाटील यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून दिनांक ०९/०५/२०२५ रोजी मध्यान्होत्तर कार्यमुक्त करण्यात आले आहे.
महेश पाटील, यांचेकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, निवडणूक विभाग, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग या विभागांचा अतिरिक्त पदभार स्वतंत्र आदेशाने सोपविण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
COMMENTS