Pune PMC News | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा पुणे महापालिकेकडून सन्मान

Homeadministrative

Pune PMC News | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा पुणे महापालिकेकडून सन्मान

Ganesh Kumar Mule Oct 29, 2025 8:53 PM

Pune City Traffic | पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी | नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन
PMC election 2022 | सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव  | सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त | प्रारूप मतदारयाद्या जाहीर 
7th Pay Commission | PMPML | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता खात्यात जमा | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्याला यश

Pune PMC News | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा पुणे महापालिकेकडून सन्मान

 

PMC Labor Welfare Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या इ१० वी व १२ वी मध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या पाल्यांचा सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी तथा मोटिव्हेशनल स्पीकर के.सी.कारकर,  यांच्या हस्ते सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश कार्यक्रम संपन्न झाला. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीमार्फत दरवर्षी पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या इ.१०वी १२ वी मध्ये ६५% व त्यापेक्षा जास्त टक्के मिळविलेल्या पाल्यांचा सत्कार करून त्यांना शालोपयोगी साहित्य भेट देवून गौरविले जाते.

त्यानुसार आज या पाल्यांचा आज सत्कार समारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) पवनीत कौर, , सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी (प्रमुख पाहुणे व मोटिव्हेशनल स्पीकर) के सी कारकर  तसेच नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी व इतर मनपा अधिकारी यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमात १६७ पाल्यांना इ.१०वी १२ वी मधील त्यांच्या यशाबद्दल शालोपयोगी साहित्य देवून गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमास नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी तथा सचिव कामगार कल्याण निधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कामगार कल्याण निधीतर्फे आयोजित सर्व योजनांची माहिती दिली व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत त्यांचे अभिनंदन आहेच परंतु ज्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी निराश व्हायचे कारण नाही. त्यांनी १२ th फेल या सिनेमाचे उदाहरण देत १२ वी फेल विद्यार्थी नंतर आयपीएस झाल्याचे उदाहरण दिले. ज्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनाही पुढे चांगले यश मिळू शकते असे सांगून विद्यार्थांना प्रोत्साहित केले.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कारकर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या इच्छा अनेक असतात पण आपल्याला तेच मिळणार आहे ज्यासाठी आपण पात्र आहोत. आपली अधिकारी होण्याची/ जीवनात यशस्वी होण्याची इच्छा पूर्ण होवू शकते परंतु त्यासाठी स्वतःला आपण पात्र बनवायला हवे. व्यक्तिमत्वाचे १०८ पैलू आहेत. त्यापैकी पहिला पैलू इमोशनल कोशंट आहे. आपल्या भावनांना नियंत्रित ठेवणे किती आवश्यक असते, भावना नियंत्रित न ठेवल्यास त्याचे किती वाईट परिणाम होवू शकतात याचे प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले नैपुण्य कशामध्ये आहे हे ओळखता आले पाहिजे व ज्याला स्वतःचे टॅलेंट व गती ओळखता आली व त्यादृष्टीने त्याने वाटचाल केल्यास त्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे. त्याकरिता त्यांनी CRSE (C- Consistancy, एखाद्या कामात सातत्य असणे, R- Refine पहिल्या प्रयत्नात अपयश आले तर त्याचे कारणे शोधून आणखी रीफाईन करणे, S- Self motivated स्वतःला काही चांगल्या शिस्त लावून घेणे, E- Efforts कष्टपूर्वक प्रयत्न करणे) हा फॉर्मुला सांगितला. Self Motivation हे किती आवश्यक आहे व त्यामुळे स्वतःला शिस्त कशी लागते व याच्यामुळे जीवनात किती यश मिळू शकते याची उदाहरणे दिली. आपण एखाद्या कामात अयशस्वी झालो तर आपल्या अपयशाच्या ज्या वेदना आहेत त्यांना अधिक प्रयत्न करून प्रगती आणि यशामध्ये रुपांतरीत करा (Trasform your pain into progress and success) हे त्यांनी भारतातील व परदेशातील अनेक व्यक्तिमत्वांची उदाहरणे देवून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना विचार करायला प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनिषा कायटे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: