Pune PMC Election 2025 | ४१ प्रभाग तर १६५ नगरसेवक! | पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 

Homeadministrative

Pune PMC Election 2025 | ४१ प्रभाग तर १६५ नगरसेवक! | पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 

Ganesh Kumar Mule Aug 22, 2025 9:32 PM

Naval Kishore Ram IAS | अनधिकृत फ्लेक्स लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून दंड तर घेतला जाणारच | शिवाय आता प्रिंटींग प्रेस ला देखील महापालिका आयुक्त यांचा इशारा 
Pune Okayama Friendship | पुणे – ओकायामा मैत्रीची 20 वर्ष | कलाग्राम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
City Transformation Cell | शहर स्तरावर शहर परिवर्तन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय | सर्व विभागाचे नोडल अधिकारी असतील | कक्षाची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा

Pune PMC Election 2025 | ४१ प्रभाग तर १६५ नगरसेवक | पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

 

Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केली आहे. यावर आता हरकती आणि सूचना घेतल्या जातील आणि अंतिम प्रभाग रचना केली जाईल. दरम्यान यामुळे आता निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आता जोरदार तयारी करत आहेत. (PMC Election Draft Ward Structure)

 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी  महानगर पालिकेच्या हद्दीत एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल. महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ चे जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे.

एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांच्या हरकती/सूचना दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ते दि. ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील, असं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं.

प्रभाग नावे आणि त्याची लोकसंख्या

१ कळस – धानोरी –  92644
२ फुलेनगर- नागपूर चाळ – 92640
3 विमाननगर लोहगाव – 92410
४ खराडी – वाघोली – 92283
५ कल्याणी नगर – वडगावशेरी – 91381
६ येरवडा – गांधीनगर –  77606
७ गोखलेनगर – वाकडेवाडी – 89957
८ औंध – बोपोडी  – 89693
९ सुस- बाणेर- पाषाण – 90903
१० बावधन – भसारी कॉलनी – 84127
११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर – 76204
१२ छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी – 77669
१३ पुणे स्टेशन – जय जवान नगर – 88569
१४ कोरेगाव पार्क – मुंढवा – 91160
१५ मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी – 93470
१६  हडपसर – सातववाडी – 92232
१७ रामटेकडी – माळवाडी – 92665
१८ वानवडी – साळुंखेविहार – 85872
१९ – कोंढवा खुर्द – कौसरबाग 84619
२० बिबवेवाडी – महेश सोसायटी – 82299
२१ मुकंदनगर – सॅलसबरी पार्क – 80082
२२ काशेवाडी – डायस प्लॉट – 79703
२३ रविवार पेठ – नाना पेठ – 76264
२४ कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ – 76233
२५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई – 76262
२६ गुरुवार पेठ – घोरपडे पेठ – 76984
२७ नवी पेठ – पर्वती – 76111
२८ जनता वसाहत – हिंगणे खर्द – 76550
२९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी – 76194
३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी – 76903
३१ मयूर कॉलनी- कोथरूड – 83098
३२ वारजे – पॉप्युलर नगर – 82537
३३ शिवणे – खडकवासला – 87814
३४ नऱ्हे  – वडगाव बुद्रुक – 92441
३५ – सनसिटी- माणिक बाग – 78493
३६  सहकारनगर – पदमावती – 84660
३७ धनकवडी – कात्रज डेअरी – 88253
३८ आंबेगाव – कात्रज – 114970
३९ अप्पर सुपर इंदिरानगर – 75944
४० कोंढवा बटुक – येवलेवाडी – 76498
४१ महंमदवाडी – उड्री – 86962

एकूण                          3481359


Pune Draft Wards 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: