Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 

HomeपुणेBreaking News

Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 

कारभारी वृत्तसेवा Nov 24, 2023 3:17 PM

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा
MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 
MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा

 

Marathi Board | MNS Pune | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत न केलेल्यावर आस्थापनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडून देण्यात आला आहे.

मनसे ने दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अँड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात मराठीतच दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी.तसेच सर्व पाट्या मराठी भाषा मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी.

स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात मनसे तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.