Pune Municipal Corporation Servants Co-Op. Urban Bank Ltd | पुणे महापालिका आणि पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’!
| दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव बँकस फेडरेशन लि च्या वतीने दिला जातो पुरस्कार
PMC Employees Bank – (The Karbhari News Service) – पुणे म्यूनिसपल कॉर्पोरेशन सर्व्हेंटस् को-ऑप. अर्बन बँक लि. ( Pune Municipal Corporation Servants Co-Op. Urban Bank Ltd) ही सहकारी बँक पुणे महापालिका, शिक्षण विभाग आणि पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाते. बँकेची चांगली कामगिरी पाहून पगारदार नोकरांच्या गटातील बँका या गटातून या बँकेला २०२३-२४ चा सर्वोकृष्ट बँक पुरस्कार म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव बँकस फेडरेशन लि (The Maharastra Urban Cooperative Banks Federation Limited) च्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. २८ सप्टेंबरला या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. (Pune Municipal Corporation Employees)
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कारांनी सन्मानीत करत असते. बँकेला मिळणारा हा पुरस्कार केवळ त्या संस्थेच्याच लौकिकात भर घालीत नाही तर सर्व संचालक, व्यवस्थापन, कर्मचारी तसेच सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना नवे चैतन्य, आनंद मिळवून देत असतो. (PMC Employees Loan)
त्यानुसार फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या सन २०२३ २४
च्या ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कारासाठी ‘पगारदार नोकरांच्या गटातील बँका’ या गटातून पुणे म्यूनिसपल कॉर्पोरेशन सर्व्हेंटस् को-ऑप. अर्बन बँकेस ‘द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २८ सप्टेंबर, रोजी दुपारी २:३० वाजता ‘कॉसमॉस टॉवर, २ रा मजला, १३२ / बी, गणेशखिंड रोड, रेंज हिल कॉर्नर, आयसीएस कॉलनी, पुणे’ या ठिकाणी हा पुरस्कार समारोह होणार आहे.
या बाबत बँकेचे अध्यक्ष अजय गोळे यांनी सांगितले कि, पुणे महापालिका कर्मचारी, शिक्षण विभाग कर्मचारी आणि पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी ही सहकारी बँक चालवली जाते. गेल्या १०८ वर्षाहून अधिक काळ झाला ही बँक कार्यरत आहे. वर्ग १ ते ३ मधील सर्व कर्मचाऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. ज्याची मर्यादा १५ लाख आहे. पूर्वी ही मर्यादा १० लाख होती. यास जामीन की कर्ज (Personal Loan) असे म्हटले जाते. मर्यादा वाढवल्याने कर्मचाऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे.
गोळे यांनी पुढे सांगितले कि, कर्मचाऱ्यांना फक्त पे स्लिप आणि २ जामीनदार यांच्या आधारावर कर्ज दिले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर कुठल्या कागदपत्रांची कटकट नसते. तसेच कर्जाचे व्याजदर देखील माफक असतात. शिवाय एफडी चे दर देखील चांगले आहेत. बँकेचे कर्ज वसुलीचे प्रमाण हे १००% आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच कर्जाचा हप्ता वसूल केला जातो. या कारणामुळेच फेडरेशनचा दरवर्षी आम्हाला पुरस्कार मिळतो. या पुरस्काराबाबत आम्ही समाधानी आहोत.
बँकेचे
COMMENTS