Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | परीक्षा देऊ न इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोर्टाचा दिलासा | प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम 

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | परीक्षा देऊ न इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोर्टाचा दिलासा | प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम 

गणेश मुळे Jan 25, 2024 6:58 AM

Hoarding Rates | होर्डिंग धारकांना राज्य सरकारचा दिलासा! | महापालिका आयुक्तांच्या मनमानी प्रस्तावाला केराची टोपली
Pune Bhide Wada Smarak News | भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा ! | स्मारक खटल्याचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने
Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकर घ्या | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश 

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | परीक्षा देऊ न इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोर्टाचा दिलासा | प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम

|  महापालिका प्रशासनाकडून 28 जानेवारीला परीक्षा

| वर्ग 3 आणि 4 मधून कर्मचारी होणार JE

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून (Class 3 and 4) अभियांत्रिकी संवर्गात (Engineering Cadre) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) या पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. महापालिका प्रशासनाने त्याची तयारी केली असून 28 जानेवारी 2024 ही परीक्षा (Exam) होणार आहे. मात्र या परीक्षेबाबत सर्व उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नायायालयाने या उमेदवारांना दिलासा दिला आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. (Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (civil) promotion)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
सरकारकडून प्रस्ताव मान्य होऊन आल्याबरोबर प्रशासनाने तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मात्र यात नवीन कुठले अर्ज न मागवता या आधीच पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. वर्ग 3 आणि 4 मधील हे 60 कर्मचारी आहेत. प्रशासनाकडून सांगण्यात आले कि हा निर्णय प्रशासन घेऊ शकते. त्यात आधीच पदोन्नती देण्यात उशीर झाला आहे. नवीन अर्ज मागवले तर अजून प्रक्रिया लांबेल. त्यामुळे पहिल्याच कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान या पदोन्नती बाबत महापालिका प्रशासनाकडून 2021 पासूनच तयारी सुरु केली होती. मात्र काही उमेदवारांनीच यात खोडा घातल्याने ही पदोन्नती लांबत गेली. परराज्यातून पदवी आणणाऱ्या लोकांबाबत देखील आक्षेप घेतले गेले होते. त्यातच महापालिका प्रशासनाने पदोन्नती देताना सेवाज्येष्ठतेचा विचार न करता परीक्षा घेण्याची भूमिका घेतली आणि प्रस्ताव सरकारकडे पाठवला. सरकारने दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार नवीन नियमाचा आधार घेऊन आता ही परीक्षा घेतली जाणार आहे. (PMC Pune junior Engineer civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव आणि स्थापत्य ची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्यानुसार 28 जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. 100 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे. यात उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण मिळणे आवश्यक आहे.
खरे पाहता काही उमेदवारांनाच पाहिल्यापासूनच अशी परीक्षा घेण्याला विरोध होता. त्यांची मात्र चांगलीच गोची झाली होती. त्यानुसार या उमेदवारांनी महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने या उमेदवारांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे कि याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा देऊन ते त्यात नापास झाले तरी प्रशासनाला या उमेदवारांना पदोन्नती साठी अपात्र करण्याचा अधिकार नाही. हा उमेदवारांना दिलासा मानला जात आहे. तसेच याबाबतच्या अडचणी टाळण्यासाठी महापालिकेने परीक्षा घेऊ नये, असे कोर्टाने म्हटले आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. आम्ही ऐनवेळेला परीक्षा रद्द करणार नाही. असे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले कि हा काही कोर्टाचा अंतिम निर्णय नाही. काही निर्णय हे कोर्टाने आमच्यावर सोपवले आहेत. त्यानुसार आम्ही परीक्षा घेणार आहोत. शिवाय पुढील सुनावणी वेळी आम्ही आमची बाजू चांगल्या पद्धतीने मांडणार आहोत.
| कुठे होणार आहे परीक्षा? 

28th Jan., 2024 ला 11:30 वाजता परीक्षा होणार आहे. त्यासाठी एक तास अगोदर उपस्थित राहायचे आहे.

ION DIGITAL ZONE IDZ RAMTEKDI 3, GATE 3, SAHAYOG DIGITAL HUM S. NO. 107/01, PTNO.7, RAMTEKADI INDST. EST.2, NR. HP PETROL PUMP, RAMTEKADI INDUS. AREA, HADAPSAR, PUNE – 411

या ठिकाणी परीक्षा होईल.
The karbhari - pune municipal corporation (pmc)

कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदोन्नती परीक्षा ठिकाण आणि वेळापत्रक

| परीक्षा असणाऱ्या उमेदवारांना देखील मराठा आरक्षण सर्वेक्षण चे काम 
दरम्यान शहरात राज्य सरकारच्या आदेशानुसार मराठा आरक्षण सर्वेक्षण चे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेच्या जवळपास 2500 कर्मचाऱ्यांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये 28 ला परीक्षा असणाऱ्या कनिष्ठ अभियंता यांचा देखील समावेश आहे. सर्वेचे काम नाही केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या कर्मचाऱ्यांनी हे काम देऊ नये अशी मागणी केली होती. तरीही त्यांना हे काम देण्यात आले आहे. 31 जानेवारी पर्यंत हे काम चालणार आहे. असे असेल तर आम्ही परीक्षेचा अभ्यास कधी करायचा आणि परीक्षेला काम थांबवून कसे जायचे? असे प्रश्न हे कर्मचारी विचारात आहेत.
महापालिका प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे 28 जानेवारीला परीक्षा होणार आहे. परीक्षा घेण्यावर आम्ही पहिल्या पासून ठाम आहोत. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे आम्हांला कुठल्या उमेदवारांना अपात्र करता येणार नाही. दरम्यान हा कोर्टाचा अंतिम निर्णय नाही. कोर्टात महापालिका आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडेल.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग 
—-