Rashtriy Majdur Sangh (RMS) : Sunil Shinde : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन 

HomeBreaking Newsपुणे

Rashtriy Majdur Sangh (RMS) : Sunil Shinde : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन 

Ganesh Kumar Mule Feb 16, 2022 3:42 PM

Finally, action was taken on the controversial hoarding erected in front of the Pune Municipal Corporation (PMC)!
PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका | लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Republic Day : PMC : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महापालिकेचे हे मनमोहक रूप! : video

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन

: कामगार नेते सुनिल शिंदे यांची माहिती

पुणे : महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या(Contract labours) विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ(RMS) या संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरआज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कंत्राटी सुरक्षा रक्षक, स्मशान भूमी कर्मचारी, पाणी पुरवठा, कीटक नाशक, झाडणकाम अशा विविध विभागातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना(PMC Commissioner) देण्यात आले.

ठेकेदार बदलला तरी कामगारांना कामावरून कमी करु नये, कंत्राटी सेवकांना दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान,कोविड भत्ता, मिळावा, पगार वेळेवर मिळावा, सुधारित वेतन फरक आणि इ. एस. आय. सी. आणि पी. एफ. विवरण पत्र मिळाले,, राष्ट्रीय सणांच्या सुट्टी मिळावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. जागरण गोंधळ आंदोलनाच्या वेळी कामगारांना संबोधित करताना राष्ट्रीय मजदूर संघ या संघटनेचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांनी कामगारांना आश्वासन दिले की एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही. याची संघटनेकडून खात्री आहे. मात्र कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता संघटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
या आंदोलनाची फलश्रुती म्हणजे आत्ताचे ठेकेदाराने पी.एफ. व ई. एस आय. सी आय. .कपातीचे चलन कॉपी (प्रत) संघटनेकडे सुपुर्द केली. तसेच सर्व सुरक्षा रक्षकांना गणवेश व ई. आय. एस. सी . कार्ड ताबडतोब देण्याचे मान्य केले.त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लवकरच मनपा आयुक्तांच्या दालनात संबंधित अधिकारी, ठेकेदार, व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल.  सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. ठेकेदारांकडून बऱ्याच गोष्टींची पूर्तता होत आहे.आता मनपा प्रशासनाने ठेकेदारांची बिले अदा केल्यास पुढील पगार वेळेवर केलें जातील असे ठेकेदारांनी मान्य केले आहे.

या आंदोलनाचे प्रास्ताविक संघटना उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले तर समारोप संघटनेचे सरचिटणीस एस. के. पळसे यांनी केले. संघटना पदाधिकारी, सुरक्षा रक्षक, पदाधिकारी, विजय पांडव, स्वप्निल कामठे,सौ. जान्हवी दिघे,बाळू दांडेकर, उज्वल माने, अरविंद आगम, सचिन घोरपडे, रमेश भोसले, विनायक देगावकर, उमेश कोडीतकर, स्मशान भूमी प्रमुख संघटना गोरख कांबळे, पाणी पुरवठा शंकर वाडे , सोमनाथ चव्हाण, योगेश मोरे, किटकनाशक विभाग श्री. पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0