Pune Municipal Corporation Additional Commissioner |  अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत आता उरले दोनच अधिकारी! | दोघांनी घेतली माघार!

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत आता उरले दोनच अधिकारी! | दोघांनी घेतली माघार!

गणेश मुळे Feb 14, 2024 2:19 AM

PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई 
PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!
PMC Retired Employees | सह महापालिका आयुक्त गालिंदे, मुख्य अभियंता कंदूल यांच्यासहित महापालिकेचे 70 कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त

Pune Municipal Corporation Additional Commissioner |  अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत आता उरले दोनच अधिकारी! | दोघांनी घेतली माघार!

Pune Municipal Corporation Additional Commissioner | पुणे | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाच्या शर्यतीत आता दोनच अधिकारी उरले आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार नगर अभियंता यांना पदासाठी प्राथमिकता असणार होती. मात्र प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) आणि मुख्य अभियंता (Shrinivas Bonala PMC) श्रीनिवास बोनाला यांनी लेखी पत्र देऊन आपण इच्छुक नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar) आणि मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Shrinivas Kandul PMC) या दोघांत आता चुरस होणार आहे. दरम्यान यासाठी काल पदोन्नती समितीची बैठक सरकारकडून आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. आता पुढील बैठकीत पदाबाबत निर्णय होईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  (Pune Municipal Corporation(PMC)
महापालिका (Pune Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त पदाबाबत (Additional Commissioner PMC) मागील वेळी जी पदोन्नती समितीची (DPC) बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात जवळपास तासभर चर्चा झाली होती. मात्र अतिरिक्त आयुक्त कुणाला करायचे, याचा निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. पदाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्यात अजून स्पष्टता आणल्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार पुढील समितीची बैठक राज्य सरकारकडूनच ठरवली जाणार होती. त्यानुसार मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ती ही बैठक होऊ शकली नाही.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मागील वेळेस हक्काचे असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) हातून हे पद निसटले होते. काही काळाने हे पद रिक्त होणार आहे. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी अधिकारी पात्र होत आहेत. या अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश होता.
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पदरिक्त झाले होते. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पदनियुक्त केले जाणार आहे. यासाठी बरेच जण पात्र ठरत होते. मात्र राज्य सरकारने महापालिका अधिकाऱ्यांना हे पद न देता विकास ढाकणे यांच्या रूपाने सरकारचा अधिकारी या पदावर दिला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या हातून हे पद निसटले होते. (PMC Pune)

| प्रशांत वाघमारे आणि बोनाला यांचे लेखी पत्र

दरम्यान चार पात्र अधिकाऱ्यांमधून दोघांनी माघार घेतली आहे. नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. वाघमारे यांनी म्हटले आहे कि अतांत्रिक कामात मला रस नाही. त्यामुळे या पदाबाबत मी इच्छुक नाही. तर बोनाला यांनी देखील आपण या पदाबाबत इच्छुक नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे आता कळसकर आणि कंदूल या दोघापैकीच कुणीतरी एक अतिरिक्त आयुक्त होणार आहे. हे जवळपास निश्चित झाले आहे.

|  श्रीनिवास कंदूल यांनी याआधीच केलीय सरकारकडे तक्रार

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) पद यावरून  महापालिकेत (Pune Municipal Corporation) जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण  विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Chief Engineer Shrinivas Kandul) यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना (Chief Secretary) पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे कि मुख्य लेखापाल यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ आहे. त्यामुळे हे पद मलाच देण्यात यावे. अशी मागणी कंदूल यांनी केली आहे.