Pune Mayor Election | Ganesh Bidkar | महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव!

HomeBreaking News

Pune Mayor Election | Ganesh Bidkar | महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव!

Ganesh Kumar Mule Feb 05, 2026 7:13 PM

PMC General Body Meeting | कालच्या मुख्य सभेत ९५ प्रस्ताव मंजूर!
PMC BJP Leader Ganesh Bidkar | गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी | शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार – गणेश बिडकर
Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

Pune Mayor Election | Ganesh Bidkar | महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव!

| उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेत भारतीय जनता पार्टीकडे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची असली, तरी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे, अशी माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे. (Ganesh Bidkar PMC BJP Leader)

 

 

 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी पक्षातील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमधून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पहिल्याच मुख्य सभेत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0