Pune Illegal Hoardings | अनधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्यासाठी एजेन्सी नियुक्त केली जाणार   | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Homeadministrative

Pune Illegal Hoardings | अनधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्यासाठी एजेन्सी नियुक्त केली जाणार   | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 8:54 PM

Pune PMC News | ट्युलिप मधील कनिष्ठ अभियंत्यांचा 4 महिन्यांपासून प्रलंबित वेतनाचा मार्ग मोकळा!
Shrinath Bhimale PMC | मुंढवा-केशवनगरमधील ८८ हेक्टर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण मोकळे होणार
Hinjewadi Incident | हिंजवडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी – हेमंत रासने

Pune Illegal Hoardings | अनधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्यासाठी एजेन्सी नियुक्त केली जाणार   | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहरात अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग किती आहेत, याची मोजणी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Standing Committee)

पुणे शहरीतील अनधिकृत होर्डिंग वर पुणे महापालिकडून कडक कारवाई केली जात आहे. शहरामध्ये किती अनधिकृत होर्डिंग आहेत, याची माहिती प्रशासनाला देता आले नाही यावरून स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी यांनी संताप व्यक्त करत नेमके किती होर्डिंग अनधिकृत आहेत तसेच किती थकबाकी आहे याची माहिती प्रशासनाला विचारली. त्यावर आकाशचिन्ह विभागाने शहरांमध्ये एक हजार ते दीड हजार अनधिकृत होर्डिंग असल्याचा अंदाज व्यक्त केला. यावर सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले असून संबंधित विभागाने सल्लागार संस्थेच्या नेमणुकीचा प्रस्ताव दिला होता, त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आले आहे.

शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत. परंतु त्या अधिकृत आहे की अनधिकृत आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही.  गेल्या काही दिवसांमध्ये केवल ६७ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आकाश चिन्ह विभागाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

दरम्यान, शहरातील अधिकृत होर्डिंग धारकांची  ७० ते ८० कोटी रुपयांची थकबाकी आहे, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून कार्यवाही केला जाणार आहे. ही वसूली एक महिन्याच्या आता वसूल करण्याचे आदेश  भिमाले यांनी आकाश चिन्ह विभागाला दिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: