Pune Congress | पुणे कॉंग्रेस इच्छुकांच्या दोन दिवस घेणार मुलाखती | कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक लढविण्याऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवार १७ व गुरूवार १८ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेस भवन येथे होणार आहेत. (Pune News)
प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. २० च्या इच्छुकांच्या मुलाखती १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.०० या वेळेत होतील तर
प्रभाग क्र. २१ ते प्रभाग क्र. ४१ च्या इच्छुकांच्या मुलाखती १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.०० या वेळेत काँग्रेस भवन येथे होणार आहेत.
सदर मुलाखती काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवड मंडळाचे नेते यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे. असे आवाहन शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.

COMMENTS