Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

HomeपुणेBreaking News

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

गणेश मुळे Apr 03, 2024 2:57 PM

Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Pune Breaking News | कात्रज कोंढवा रस्ता – जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांकडून आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा!
Pune PMC News | स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत १५ दिवसीय विशेष स्वच्छता अभियान | प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹५० लाख पारितोषिक

Pune Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बी विंगमधील चौथ्या मजल्यावर तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.

या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रारी स्विकारण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून कक्षाकडे १८००२३३०१०२ आणि १९५० या टोल फ्री क्रमांक किंवा cvigilldccelection2024@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तक्रार करता येईल. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित सहायक निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात येते.

कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

000