Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता? | महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल

HomeपुणेBreaking News

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता? | महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल

गणेश मुळे Apr 03, 2024 1:56 PM

Kothrud Bavdhan Ward Office | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन व समाज विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन 
Dr Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन
Dr Ambedkar Jayanti 2024 | बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन व महापालिकेची बैठक संपन्न! 

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता?

| महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल

Dr Ambedkar Jayanti 2024 – (The Karbhari News Service) – 14 एप्रिल अर्थात  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात कार्यक्रम घेतला जातो. मात्र या तयारीची कामे ही 13 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत चालतात. अधिकाऱ्यांच्या या कामाच्या पद्धती बाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच सर्व मूलभूत सुविधा विषयक कामे 10 एप्रिल पर्यंत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. (Pune Municipal Corporation (PMC)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांनी आज विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. महापालिकेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी कसे नियोजन असेल, याबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सादरीकरण केले. (Pune PMC News)
यानंतर महापालिका आयुक्तांनी विविध सूचना केल्या. पुतळा परिसरातील रेलिंग काढून तिथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था करा. टँकर चे पाणी देण्यापेक्षा कुणी स्वयंसेवी संस्था पाणी देण्यास तयार आहे का, याची माहिती घ्या. टॉयलेट ची दुरवस्था असते. त्यात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व मूलभूत सुविधा द्या, असे सांगितले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो हे माहित असताना जयंतीच्या आदल्या रात्री पर्यंत का कामे करत बसता, असा परखड सवाल करत ही कामे 10 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

| मोबाईल बंद ठेवाल तर कारवाई करू – आयुक्त

दरम्यान महापालिका आयुक्तांनी विविध अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. त्यांनी सर्व कामे पार पाडायची आहेत. ऐन वेळेला कुणी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने फोन बंद ठेवला तर त्यावर कारवाई करू. असा इशारा देखील आयुक्त डॉ भोसले यांनी दिला.