Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

HomeपुणेBreaking News

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

गणेश मुळे Apr 19, 2024 7:12 AM

MLA Sunil Kamble | पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्त्वत: मान्यता | आमदार सुनील कांबळे यांची माहिती
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
CM Devendra Fadnavis | पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळाचे विलिनीकरण :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

| पुणे महापालिकेने सुरु केली प्रक्रिया

Pune and Khadki Cantonment Board in PMC limit- (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment board and Khadaki Cantonment board) पुणे महापालिकेत (PMC) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात येणार आहे. दरम्यान या दोन्ही बोर्डातील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पुणे महापालिकेने सुरु केली आहे. उपायुक्त महेश पाटील (Mahesh Patil PMC) यांनी याबाबतचे आदेश महापालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. आता ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्यातील नागरी वस्तीचा समावेश महापालिकांमध्ये करण्याचा तर लष्कराच्या ताब्यातील भाग एक्स्क्लुजिव्ह मिलिटरी स्टेशन्स म्हणून लष्कराच्या ताब्यात ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे लष्कराच्या ताब्यातील लाखो हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात जाऊन विकासासाठी खुली होणार आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा बदल सुचवला आहे. (PMC Pune Cantonment board)

दरम्यान केंद्र शासन अर्थात  संरक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना हस्तांतरित करणेबाबत 4 मार्च रोजी  सह सचिव, संरक्षण
मंत्रालय, भारत सरकार यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट
बोर्ड व. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संयुक्त बैठक घेण्यात
आली होती.  या बैठकीत संरक्षण विभागाने खडकी/पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांची सर्व माहिती पुणे महानगरपालिकेस देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांनी 13 मार्च l रोजी पुणे सब एरीया येथे संयुक्त बैठक आयोजित करून प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले.

 प्रेझेन्टेशन प्रमाणे संरक्षण विभागाच्या अधिसुचनेसुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना अस्थापना / मनुष्य बळ हस्तांतरित करणेसाठी विविध विभागांचे समन्वय आवश्यक आहे.  पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांचे प्रेझेंटेशन प्रमाणे महापालिकेच्या विविध विभागाकडे हस्तांतरित होणाऱ्या आस्थापना / मनुष्य बळ यांचे संबंधिताकडून मेळ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्याशी समन्वय साधून आपल्या विभागाकडे हस्तांतरित होणारी संसाधने, आस्थापना / मनुष्यबळ यांची माहिती व त्याबाबत आपल्या विभागाचे मुद्दे इ.बाबींची माहिती तयार ठेवावी. आवश्यकते प्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करावी. असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातील  कॅन्टोन्मेंट बोर्ड

महाराष्ट्रात पुणे, खडकी, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली (नाशिक) आणि नागपूर अशी सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ही सातही कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. (Cantonment board)

62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लाखो हेक्टर जागा
देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या ताब्यात एक लाख साठ हजार एकर जागा आहे. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये राहते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खाजगी मालमत्ता देखील लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराकडून मूळ मालकांशी दर काही वर्षांनी त्यासाठी भाडेकरार देखील केला जातो. लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास कामे आणि बांधकामासाठीच्या एफएसआयला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Pune News)