Pune Airport New Terminal | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ सेवा कार्यान्वित !| प्रवाशांना मोठा दिलासा, वेळेची होणार बचत
Digiyatra Seva – (The Karbhari News Service) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ या चेक इन प्रणालीचे लोकार्पण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या हस्ते करण्यात आले. डिजियात्रा’ सुरु झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून तर विमानात बसेपर्यंतची प्रक्रिया सुलभ, सहज आणि सोपी झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या रांगा टळणार असून वेळेची बतच होणार आहे. (Pune International Airport)
देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु आहे. डिजीयात्रा प्रणाली कार्यान्वित करणे हा त्यापैकीच एक भाग आहे. डिजी यात्रा पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया पेपरलेस आणि डिजिटल पद्धतीने पार पाडता येते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे आणि सीआयएसएफचे अधिकारी उपस्थित होते.
देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत दीड कोंटींहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजीयात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजीयात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने याचा मोठा फायदा पुणेकरांना विमान प्रवाशांना होणार आहे.
धावपट्टीचा विस्तार वेगाने करणार …
पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणे, आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलत कामे सुरू केली आहेत. नुकताच ओएलएस सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाल्यावर आम्हाला येथे किती जागेचे भुसंपादन करावे लागेल, याची माहिती मिळणार आहे. माहिती मिळल्यावर खासगी जागा किती भुसंपादन करायची आणि डिफेन्सची किती जागा घ्यायची, यादृष्टीने कामे होती. जागा मिळाल्यावर लगेचच धावपट्टीचे विस्तारीकरण केले जाईल, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
COMMENTS