Pune 10th Ranking | Pune 5 Star City | स्वच्छ सर्वेक्षण च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये पुणे 20 वरून 10 व्या स्थानावर
| महाराष्ट्रात 2nd रँक
Pune 10th Ranking | Pune 5 Star City | पुणे महापालिका स्वच्छतेबाबत (Pune Municipal Corporation) करत असलेल्या प्रयत्नामुळे पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. तसेच पुणे महापालिकेला (PMC Pune) स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Swachh Survey 2023) मध्ये 1 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात 10 वी रँक (Pune 10th Rank) मिळाली आहे. मागील वर्षी पुणे 20 व्या स्थानावर होते. तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 9 व्या स्थानावर आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुणे 2 ऱ्या स्थानावर (Pune 2nd Rank in Maharashtra) आले आहे. नुकताच केंद्र सरकारकडून महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला आहे. पुणे महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. (PMC Pune News)
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराचा नावलौकिक झाला आहे. तसेच विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बरीच बिरुदे पुणे शहराला मिळाली आहेत. त्यात अजून एक नावलौकिकाची भर पडली आहे. पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग (PMC Solid Waste Management Department) यासाठी सातत्याने प्रयत्नशील होता. पुणे शहर आतापर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र आता यात वाढ होऊन ते 5 स्टार झाले आहे. याबाबत सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्वे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा 20 विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टीत महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे महापालिका हा ‘किताब मिळवू शकली आहे. पुणे महापालिका आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जायका प्रकल्प अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र होऊ शकते. (Pune PMC News)
दरम्यान नुकतेच केंद्र सरकारकडून पुणे शहराला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच आज म्हणजे 11 जानेवारीला पुणे महापालिकेला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षण मधील रँकिंग समजली आहे. त्यानुसार 1 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 20 व्या रँकिंग वरून 10 व्या स्थानावर आले आहे. तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 9 व्या स्थानावर आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुणे 2 ऱ्या स्थानावर आले आहे. नुकताच केंद्र सरकारकडून महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने राज्यातून फक्त 3 शहरांनाच निमंत्रण दिले होते. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश होता. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे.
—-
पुणे शहराला याआधीच 5 स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात आता रँकिंग देखील वाढली आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामगिरीवर केंद्र सरकारने मोहोर लावली आहे. मागील वर्षी पेक्षा खूप सुधारणा आपण केल्या आहेत. महापालिका आपल्या कामगिरीत अजून चांगल्या सुधारणा करणार आहे. आता आपण 7 स्टार आणि वॉटर प्लस साठी प्रयत्न करणार आहोत. तसेच शहर भारत भरात पहिल्या 3 मध्ये कसे राहील, याबाबत देखील प्रयत्न सुरु राहणार आहेत.
– डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
—
स्वच्छ सर्वेक्षण 2023, (SS23), आपल्या पुणे महापालिकेला 5 स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच आता रँकिंग देखील कळली आहे. 20 वरून दहाव्या स्थानावर येणे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर राहणे ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे यात सर्वांचे मोलाचे योगदान आहे. मात्र आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आता शहराला पहिल्या 5 मध्ये आणण्याचा प्रयत्न करू.
– संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
—