Archana Patil : अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

HomeपुणेPMC

Archana Patil : अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

Ganesh Kumar Mule Nov 03, 2021 3:48 PM

PMC : लहुजी वस्ताद फिटनेस क्लब होणार सील : मुख्य सभेत निर्णय 
Archana Patil | स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा  | माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 
Pune Potholes | BJP Women Wing | पुणे शहरातील खड्ड्यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक | महापालिका भवना समोर केले आंदोलन

अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा

नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

पुणे : प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम बंद न करता या जिमची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम ला टाळे ठोकण्याचा निर्णय झाला होता. पण या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील तरुणांचे नुकसान होईल. नव्याने टेंडर प्रक्रिया होवून जिम सुरू करणेस लागणारा वेळ हा निश्चितच तरुणांसाठी गैरसोईचे आहे.

यामुळे ही जिम बंद न करता तातडीने या जीमची निविदा प्रक्रिया राबवावी, क्रिडा अधिकारी यांचे नियंत्रणाखाली विनाशुल्क सुरू ठेवावे, जिम पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

 

अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम चे टेंडर लवकर काढावे, अन्यथा क्रिडा अधिकारी यांचे नियंत्रणाखाली विनाशुल्क सुरू ठेवावे. ज्या कोणाला ही जिम चालवायची आहे त्यांनी चालवावी. फक्त महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन करू नये.

            अर्चना तुषार पाटील, नगरसेविका, सदस्य – स्थायी समिती

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0