Prithviraj B P IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांची बदली! | राज्य सरकार चे आदेश जारी

Homeadministrative

Prithviraj B P IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांची बदली! | राज्य सरकार चे आदेश जारी

Ganesh Kumar Mule Mar 31, 2026 6:28 PM

Republic Day In PMC | पुणे महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन!
PMC Employees Agitation | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनपा भवन समोर निदर्शने | मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेणार – अतिरिक्त आयुक्त 
Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

Prithviraj B P IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांची बदली! | राज्य सरकार चे आदेश जारी

 

 

PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्या राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. पृथ्वीराज हे आता वसई विरार महापालिकेचे आयुक्त असतील. दरम्यान पुणे महापालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त पद आता रिक्त झाले आहे. इथे राज्य सरकार कुठला अधिकारी नियुक्त करणार, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Pune PMC News)

पृथ्वीराज बी पी यांचा पुणे महापालिकेतील कार्यकाळ संपत आला होता. त्यानुसार सरकारने त्यांची बदली केली आहे. वसई विरार महापालिकेचे आयुक्त एम एम सूर्यवंशी हे आज सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी पृथ्वीराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

पृथ्वीराज यांनी काही काळ पुणे महापालिकेत तिन्ही महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे कामकाज एकट्याने सांभाळले होते. तसेच मिळकत कर विभागात काही विधायक बदल केले होते. दरम्यान सरकार कडून त्यांच्या जागी अजून खाण्याची नियुक्ती करण्यात आली नाही. पुणे महापालिकेत नवीन अतिरिक्त आयुक्त कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0