Pramod Nana Bhangire | प्रमोद नाना भानगिरे, पुणे महापालिका आयुक्तांसमवेत भर पावसात थेट एकता नगर मध्ये दाखल! 

HomeपुणेBreaking News

Pramod Nana Bhangire | प्रमोद नाना भानगिरे, पुणे महापालिका आयुक्तांसमवेत भर पावसात थेट एकता नगर मध्ये दाखल! 

गणेश मुळे Aug 04, 2024 9:40 AM

PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का? 
PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे
PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 

Pramod Nana Bhangire | प्रमोद नाना भानगिरे, पुणे महापालिका आयुक्तांसमवेत भर पावसात थेट एकता नगर मध्ये दाखल!

 

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – अतिमुसळधार पावसाने पुणे शहरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांना तत्काळ मदतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणांना कार्यान्वित करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशान्वये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, उपायुक्त माधव जगताप यांच्या समवेत पुणे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, रमेश बाप्पू कोंडे घटनास्थळी पोहचले.

एकतानगर, विठ्ठलनगर, आदर्शनगर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाण्याचे जार, सौर बल्ब, भोजनव्यवस्था तातडीने पुरविण्यात आली.