Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ..!!  | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

HomeBreaking Newsपुणे

Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ..!! | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

गणेश मुळे Jan 15, 2024 2:20 PM

MLA Sunil Tingre | रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे
JICA | मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून वर्षाला 4 कोटीची वीज निर्माण होणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रकल्पाला भेट
Rashtriya Chhatra Sena | दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड

Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ..!!

| शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

 

Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या (Pune PMPML Emplyoees)  विविध मागण्यांसाठी व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena Pramod Nana Bhangire) यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट येथील पीएमपीएमएल (PMPML office Swarget Pune)  च्या मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत कायम करण्यात येईल. असे लेखी पत्र शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना दिले. (Pramod Nana Bhangire | PMPML Pune)

The karbhari - Pune PMPML Employees

दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तीव्र आंदोलनानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते (Dr Sanjay Kolte IAS) यांनी परिवहन महामंडळकडील सर्व बदली कर्मचारी यांना शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याच्या अनुषंगाने महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या PMPML बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड मागून त्याबाबत पंधरा जानेवारीलाच परिपत्रक निर्गमित करण्यात आले. तसेच या हजेरी डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी करून 15 फेब्रुवारी पर्यंत बदली कर्मचाऱ्यांची माहिती मागून पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने पुकारलेले तीव्र आंदोलन स्थगित करण्यात आले आता पुणे परिवहन महामंडळातील कामगारांच्या कायम तत्त्वावर रुजू होण्याबाबतचा प्रश्न कायमचा मिटला आहे.

Pramod nana Bhangire Pune shivsena

यावेळी पीएमपीएमएल. चे कर्मचारी उमेश पांढरे, नरेंद्र आवारे,हरीश माने,नरेश चव्हाण,निवास माने,संतोष बोंडे, हरीश ओव्हाळ, शोयेब पठाण, रुपाली धावरे,सुरेखा भालेराव,सुनील नलावडे, दिलीप मोहिते, बारिश जाधव,विलास जाधव, अंकुश अडगळे,विकास वारे,अनिरुद्ध साळुंखे,असीम शेख,माधवी लांडगे,शीतल काळे, व पीएमपीएमएल चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.