Pramod Nana Bhangire | आणखी किती पुणेकरांचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार? – प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire | आणखी किती पुणेकरांचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार? – प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Aug 06, 2026 8:38 PM

DP Road | PMC Encroachment action | डीपी रस्त्यावर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई
Urban 95 | PMC Kids Festival 2.0 | पुणे महानगरपालिकेच्या अर्बन९५ बालोत्सव २.० ला 1 लाखांहून अधिक पालक, शिक्षकांचा प्रतिसाद
Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

Pramod Nana Bhangire | आणखी किती पुणेकरांचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार? – प्रमोद नाना भानगिरे

 

Pune Shivsena – (The Karbhari News Service) – हडपसरमधील उंड्री चौक, वडाचीवाडी रस्ता येथील सैराट बिर्याणी शेजारी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या उघड्या चेंबरमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा तोल जाऊन त्या थेट चेंबरमध्ये पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी समाजमाध्यमावर (X) प्रसिद्ध केला आहे. याच ठिकाणी यापूर्वी एक रिक्षाही उघड्या चेंबरमध्ये अडकली होती. या सलग घटनांमुळे पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभाराविरोधात शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Pune Accidents)

प्रमोद नाना भानगिरे यांनी नमूद केले की, शहरातील उघडी चेंबर्स, खड्डे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या धोकादायक ठिकाणांबाबत शिवसेनेने सातत्याने आंदोलने, निवेदने आणि प्रत्यक्ष पाहणी करून पुणे महानगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधले, मात्र प्रशासनाच्या कारभारात कोणताही बदल झालेला नाही. आणखी किती पुणेकरांचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी शहरातील सर्व उघडी चेंबर्स तातडीने सुरक्षित करण्याची, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि अशा घटना पुन्हा घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: