Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking Newsपुणे

Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

गणेश मुळे May 27, 2024 1:06 PM

Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस
Pune | Property Tax Hike | पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?
G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पत्र लिहून भानगिरे यांनी  तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. (Pramod Nana Bhangire Shivsena Pune)

पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे शहर सुन्न पडले आहे. रात्री उशिरा पब व बारमधून मद्यधूंद अवस्थेत तरुणाई बाहेर पडते आणि बेधुंदपणे वाहने चालवल्यामुळे असे प्रकार घडतात असे उघडकीस आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व अनधिकृत पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत. अशी विनंती पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

भानगिरे यांनी पत्रात म्हटले आहे कि, काहीच दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाकडून बेदरकार पद्धतीने वाहन चालवित अपघात केल्यामुळे पुणेकर सुन्न झाले आहेत . पार्लर याला हुक्का पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब , बार व कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील तरुणाई मोठ्‌या संख्येने याला बळी पडत असून मद्यधुंद अवस्थेत पब व बार मधून बाहेर पडतांना अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे . पुणे शहर व जिल्ह्याचे समाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी व पुणे शहराचे नावलौकिक शिक्षण , संशोधन व सांस्कृतिक राजधानी हाच असावा याकरिता शहरातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यात टाकणाऱ्या या पब व हुक्का पार्लर संस्कृतीला तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे शहरात भान हरवून वावरणाऱ्या दिशाहीन तरुण पिढीला शिस्त लागावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.