PMC Zonal Medical Officer | आरोग्य विभागातील ५ अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती! 

Homeadministrative

PMC Zonal Medical Officer | आरोग्य विभागातील ५ अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती! 

Ganesh Kumar Mule Dec 16, 2025 2:30 PM

Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज
Pune District Government Hospitals | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा आढावा
Divisional Chief Minister’s Office | नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

PMC Zonal Medical Officer | आरोग्य विभागातील ५ अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती!

| बढती समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावाला महिला बाल कल्याण समितीची मंजुरी

PMC Officers Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागाकडील ५ वैद्यकीय तथा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. बढती समितीने नुकतीच ५ अधिकाऱ्यांची शिफारस केली होती. त्यानुसार महिला बाल कल्याण समिती समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. (PMC Health Department)
वैद्यकीय आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही पदोन्नती देताना क्षेत्रीय कार्यालयाकडील ८ वर्षाचा कामाचा अनुभव गृहीत धरला असून सेवा ज्येष्ठतेने पात्र करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

हे आहेत पदोन्नती मिळालेले ५ अधिकारी

१. रेखा गलांडे
२. अमित शहा
३. संतोष मुळे
४. स्वाती खाटपे (केतकी घाटगे)
५. दिपक पखाले
दरम्यान हा प्रस्ताव आता मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार असून त्यानंतर नेमणुका दिल्या जाणार आहेत.
– ——

पदोन्नती प्रक्रिया अडकली होती वादाच्या भोवऱ्यात

 

पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली होती. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आक्षेप घेतला होते. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. (Pune Municipal Corporation Health Department)

दरम्यान या पदासाठी ४ नोव्हेंबर बढती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत आलेल्या तक्रारीवर म्हणजे अनुभवाच्या अटीवर चर्चा झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी यावर सविस्तर अभ्यास करून आणि गरज भासल्यास सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने  सुधारणा करून या बाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला  मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रस्ताव आता राज्य सरकार कडे पाठवण्यात आला आहे.


 

परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर  पदोन्नती देण्याबाबत आम्ही महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. पदोन्नती प्रक्रियेतील अटीत सुधारणा करत आम्ही आधीच सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. नवीन सुधारणेला  राज्य सरकार मंजुरी देईल, या भरवशावर आम्ही हा प्रस्ताव सादर केला आहे.

– विजयकुमार थोरात, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: