PMC Water Supply Department | पाणी मीटर नाही बसवला तर नळजोड बंद करणार | महापालिका प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाणी मीटर नाही बसवला तर नळजोड बंद करणार | महापालिका प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा 

Ganesh Kumar Mule May 08, 2025 9:01 PM

Good news for Central Government Employees | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी | हा भत्ता लवकरच 3% ने वाढेल 
NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी
Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ..!! | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

PMC Water Supply Department | पाणी मीटर नाही बसवला तर नळजोड बंद करणार | महापालिका प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा

 

PMC Water Meter – (The Karbhari News Service) – पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणेसाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक असून त्यासाठी नळजोडास तातडीने AMR मीटर बसविणे जरुरीचे आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या मिळकतीमधील नळजोडावर AMR मीटर बसविण्यासाठी सहकार्य करण्यात यावे. अन्यथा यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता नाईलाजास्तव आपला नळजोड बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असा इशारा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना देण्यात आला आहे. (PMC Equal Water Supply Scheme)

 

पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व ग्राहकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यास्तव प्रथम वेळी बसविण्यात येणाऱ्या मीटरचा खर्च पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यास  मुख्य सभेने मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत नवीन AMR पद्धतीचे स्मार्ट पाण्याचे मीटर्स बनविण्यात येत आहेत. सदरच्या मीटरचा खर्च हा पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. सदरचा मीटर हा आपल्या मिळकतीमध्ये आपल्या सुचनेनुसार योग्य ठिकाणी बसविण्यात येणार आहे. सदरचा मीटर सुस्थितीमध्ये व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असून, सदरच्या मीटरला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यामुळे तुटल्यास, नादुरुस्त झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर/संबंधित ग्राहकावर असणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा व नागरिकांना प्रत्यक्ष होणारा पाणीपुरवठा यामध्ये विसंगती येत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीपुरवठा न होणे यासारख्या तक्रारी वारंवार येत असतात तसेच होणान्या पाणीपुरवठ्यामध्ये गळतीचे प्रमाण किती आहे, हे तपासणेही आवश्यक आहे. पाणीपुरवठा पुरेसा आहे, अगर कसे? हे तपासणेकरिता सद्यस्थितीत कोणतीही यंत्रणा नसल्याने अपुल्या पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळीच व तातडीने करणे अडचणीचे होत आहे. यास्तव पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्राधन्याने अस्तित्वातील नळ जोडास AMR मीटर बसविणे व सदर मीटरद्वारे दैनंदिन पाण्याचे मोजमाप करणे त्याच बरोबर दैनंदिन वापर होणाच्या पाण्याची मोजदाद करून त्याची मानांकनानुसार तुलना करणे व त्याद्वारे पुरेसा पाणीपुरवठा करणे व निश्चित प्रमाण ठरविणे शक्य होणार आहे.

त्यानुसार समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सध्या प्राधान्याने अस्तित्वातील नळजोडास AMR मीटर बसविण्यासाठी आपणाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. आपणाकडून आपले मिळकतीमधील नळजोडास AMR मीटर बसविण्यासाठी विरोध होत असल्यामुळे अद्याप मीटर बसविण्यात आला नसल्यामुळे साठवण टाकीवरून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे मोजमाप करणे व गळती शोधणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे आता पाणी मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.