PMC Fire Brigade | फॉर्म बी वर्षातून दोन वेळा सादर करा | पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे जाहिर आवाहन
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना व आस्थापनांना जसे ( उदा. उंच निवासी इमारती, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक व्यापारी संकुले, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये इत्यादी ) पुणे अग्निशमन दलाकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे. (Devendra Potfode Fire Brigade)
त्यानुसार महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कलम ३ पोट कलम (१) मध्ये विनिर्धिष्ट केल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये बसविलेल्या आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित व सुस्थितीत ठेवावी व याबाबतचे लायसेन्स प्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र ( फॉर्म बी) मुख्य अग्निशमन अधिकारी यांना वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये मुख्य अग्रिशमन अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, महात्मा फुले पेठ, न्यू टिंबर मार्केट, पुणे- ४११०४२ या ठिकाणी सादर करावे. सदर ( फॉर्म बी) वेळेत सादर न केल्यास व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची राहील याची नोंद घ्यावी. असे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले आहे.
–
लायसेन्स प्राप्त अभिकरणांची यादी maharashtrafireservice.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच ज्या इमारतींमध्ये आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही त्यांनी तत्काळ लायसेन्स प्राप्त एजन्सीकडून बसवून घेऊन त्यानुसार प्रमाणपत्र विहित कालावधीत अग्निशमन दलाच्या कार्यालयात सादर करावे अथवा pmcfireoffice@gmail.com या इमेलवर पाठवावे.
नागरिकांनी आपली जिवित व वित्तहानी रोखण्यासाठी इमारतींमधील उपलब्ध अग्रिशमन यंत्रणा नेहमीच सुस्थितीत व कार्यान्वित राहील याची योग्य ती खबरदारी घेऊन कार्यवाही करावी व पुणे महानगरपालिका अग्निशमन दलास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS