PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका  | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

HomeBreaking Newsपुणे

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

गणेश मुळे Jun 16, 2024 2:43 PM

Pune PMC News | गदिमा स्मारकासाठी शासनाकडून निधी मिळणार! स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना  निर्देश
PMC Deputy Commissioner | इब्राहिम चौधरी यांची पुणे महापालिकेत प्रति नियुक्तीने उपायुक्त पदी नियुक्ती! | निवडणूक आयोगाच्या आदेशाने कुणाची बदली होणार?
Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे प्रशासनाला आदेश

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका  | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पत्रानंतर आयुक्तांचा प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – दरवर्षी होणाऱ्या पावसातील समस्येच्या कोंडीतून पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांची सुटका होणार आहे. पावसाळी लाईन स्वतंत्र करण्याबरोबर या भागातील समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाहण्याचा शिरकाव होतो. याबाबत उपाययोजना करण्यासाठी पाहणी दौरा करण्याचे पत्र माझी उपमहापौर सिद्धार्थ धेडे (Dr Siddharth Dhende) यांनी  आयुक्तांना दिले होते. त्या पत्राची दखल घेत आयुक्त भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना उपाययोजनाबाबत सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात पुणे महापालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त चंद्रसेन नागटिळक, नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव, पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदींसह पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बाळासाहेब जानराव , विशाल बोर्डे , प्रभाग दोन मधील भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, आंबेडकर कॉलनीतील ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश शिंदे, अहिल्या सोसायटी, पर्णकुटी सोसायटी, राम सोसायटी, हरीगंगा सोसायटीचे सभासद, नागपूर चाळ, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, त्रिदलनगर, शांतीरक्षक, हम्स सोसायटीचे सभासद पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पावसाळ्यात प्रभाग दोन मधील निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी पत्र दिले होते. या मध्ये धेंडे यांनी नमूद केले होते की, प्रभाग दोन मधील विकसित आराखड्‌यामधील रस्ते ताब्यात घ्या. पावसाळ्यामध्ये ई-कॉमर्स झोन चौक, आंबेडकर चौक, आळंदी रोडवरीलल स्वांमी वाल्मिकि चौक व प्रभाग क्र. २ मधील नाला यावरील झालेली अतिक्रमणे हटवा आदी मागणी करण्यात आली होई. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाण्याचा शिरकाव होतो. इंदिरानगर, शांतीनगर, पंचशील नगर, चंद्रमाननगर, मोझेनगर, जाधवनगर, टिंगरेनगरचा काही भाग या परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाण्याचा त्रास होतो. तसेच नाल्याच्या परिसरात असलेल्या घरांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर उपाययोजना करण्याचे पत्र डॉ. धेंडे यांनी आयुक्तांना दिले होते.

यापत्राची दखल घेत आयुक्त भोसले यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या. या मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील ड्रेनेजची लाईन पावसाळी लाईनपासून स्वतंत्र करण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच आंबेडकर चौकातील दुर्गंधीयुक्त पाण्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हरिगंगा सोसायटीमधील गोठ्यातून ६०० एमएल पावसाळी लाईन मंजूर करण्यात आली. संरक्षण विभागाकडून ज्या ठिकाणी नाले अडविण्यात आले आहेत. त्या बाबत मंगळवारी (दि. १८) बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. हम्स सोसायटीकडे जाणार शांतीरक्षक सोसायटीचा नैसर्गिक नाला खुला करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नगररोड वरील असणाऱ्या नाल्याचे पाणी खुले करणे. अग्रेसन ते ई कॉमेरझोन दरम्यानचा रस्ता ताब्यात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र पावसाळी लाईन मंजूर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या सह पावसाळ्यात प्रभाग दोन मध्ये आपत्कालीन यंत्रणा देण्याबाबत देखील आयुक्तांनी सकारात्मकता दाखवली आहे.

—-
पावसाळ्यात नागरिकांना समस्या भेडसावत होत्या. अनेकांच्या घरात पाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. या बाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी दिल्या होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतःही हे पाहत होतो. त्यानुसार आयुक्तांना पत्र दिले होते. त्यांनी पाहणी करून सकरात्मक मार्ग काढले आहेत. या बाबत प्रभागातील नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
—————————————