Hearing on PMC Ward Structure | प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनाच्या सुनावणीचे वेळापत्रक जाणून घ्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना वेळ देण्यात आला होता. त्यानुसार ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना आल्या आहेत. यावर आता सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानुसार याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त हरकती / सूचना वरील जाहीर सुनावणी व्ही.राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग प्राधिकृत अधिकारी) यांच्या समोर ११ आणि १२ सप्टेंबर या दिवशी होणार आहे.
हरकतदारांचे नावानुसार सुनावणीचे वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.pmc.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्थळ :- बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजी नगर, पुणे – ४११००५.
११ सप्टेंबर ला १ ते २९ या प्रभागांची होईल सुनावणी
१. प्रभाग क्र. १ ते ६ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०
२. प्रभाग क्र. ०७ ते १४ – सकाळी ११.३० ते दुपारी १.००
३. प्रभाग क्र. १५ ते २१ – दुपारी ०२.३० ते सायं. ०४.००
४. प्रभाग क्र. २२ ते २९ – सायं. ०४.०० ते सायं. ०६.००
१२ सप्टेंबर ला ३० ते ४१ या प्रभागांची होईल सुनावणी
५. प्रभाग क्र. ३० ते ३४ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०
६ प्रभाग क्र. ३५ ते ३७ – सकाळी ११.३० ते दुपारी ०१.००
७. प्रभाग क्र. ३८ ते ४१ व सामाईक हरकती – दुपारी ०२.३० ते सायं. ०४.००
८. राखीव – सायं. ०४.०० ते सायं. ०५.००
तरी, विहित मुदतीत हरकत घेतलेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत सूचनापत्र पाठविलेले असून याद्वारे देखील हरकत घेतलेल्या नागरिकांना उक्त नमूद प्रभागात घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगाने नमूद तारीख व वेळेत स्वतः उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सुनावणीसाठी पाठविलेल्या सूचनापत्रातील सूचनांचे अवलोकन करावे.
असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS