PMC Ward 28 – Janata Vasahat Hingane Khurd | प्रभाग क्रमांक २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द | या प्रभागात येणारे परिसर आणि रचना सविस्तर जाणून घ्या
PMC Pune Election 2025 – (The Karbhari News Service) – जनता वसाहत – हिंगणे खुर्द या प्रभागात जनता वसाहत, पर्वती देवस्थान, विठ्ठलवाडी परिसर, असे भाग येत आहेत. प्रभागाची सविस्तर रचना आणि व्याप्ती आज आपण जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)
प्रभाग क्रमांक २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द
लोकसंख्या – एकूण – ७६५५० – अ. जा. १४५७६ – अ. ज. – ९३४
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: जनता वसाहत, पर्वती देवस्थान, पुणे महिला मंडळ पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, रामकृष्ण मठ, चंद्रनिल अपार्टमेंट, दांडेकर पुल झोपडपट्टी, रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी (भाग) पु.ल. देशपांडे उद्यान, सरितानगरी, जयदेव नगर, शारदा मठ, हिंगणे खुर्द (पार्ट), मॉटे रोझा, व्यंकटेश स्कायडेल, आनंद विहार कॉलनी, नित्यानंद हॉल परिसर, विठ्ठलवाडी परिसर, रोहन कृतिका सोसायटी इ.
उत्तर: मुठा नदी सरिता नगरी फेज १ च्या उत्तरेकडील पूर्व-पश्चिम हद्दीस जेथे मिळते, तेथून पूर्वेस सरिता नगरी फेज १ च्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे घरकुल सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे वडाची बागेच्या दक्षिणेकडील हद्दीने दत्तवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने म्हसोबा चौकात विठ्ठलराव रोकडे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मांगीरबाबा रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तर-पूर्वेस मांगीरबाबा रस्त्याने बॅ. नाथ पै चौकात लाल बहादूर शास्त्री चौकास मिळेपर्यंत.
पुर्वः मांगीरबाबा रस्ता बॅ. नाथ पै चौकात लाल बहादूर शास्त्री रस्त्यास जेथे मिळतो, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यास कान्होजी जेधे चौकास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सिंहगड रस्त्याने शाहू महाराज उड्डान पूलावरील साने गुरुजी रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे पर्वती टेकडीच्या पुर्वेकडील रस्त्याने दक्षिणेस पर्वती घरांक १६८/३ जवळ पर्वती फॉरेस्टच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथुन पश्चिमेस व पुढे सदर हद्दीने दक्षीणेस व पुढे शाहु कॉलेजच्या दक्षिणोत्तर हद्दीने पांचगांव पर्वतीच्या हद्दीस मिळेपर्यंत.
दक्षिण: शाहु कॉलेजची दक्षिणोत्तर हद्द पांचगांव पर्वती हद्दीस मिळते तेथुन पश्चिमेस पांचगांव पर्वती हद्दीने श्री तोडकर निवास यांचे दक्षिणेकडील हद्दी जवळ मौजे हिंगणे खुर्दच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस आनंदविहार कॉलनी रस्त्याने व पुढे सिंहगड ऑटो गॅरेजच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्याने मुठा कालव्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस कालव्याने आनंदनगर गल्ली क्र. ५ च्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस गल्ली क्र. ५ ने तरडे कॉलनी मधील उत्तरदक्षिण रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सरस्वती विहार इमारतीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस सरस्वती विहार इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिम उत्तरेस मौजे हिंगणेखुर्द मधील जनता सहकारी बँकेच्या उत्तरेकडील हद्दीने नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिम-दक्षिणेस सदर रस्त्याने मॉटे रोझा प्रकल्पाच्या दक्षिणेस असलेल्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने व सदर रस्त्याच्या सरळ रेषेने मुठा नदीस मिळेपर्यंत.
पश्चिमः मुठा नदी मॉंटे रोझा प्रकल्पाच्या पश्चिम-दक्षिणेस असलेल्या रस्त्याच्या रेषेस जेथे मिळते तेथून उत्तर-पूर्वेस मुठा नदीने सरिता नगरी फेज १ च्या उत्तरेकडील पूर्व-पश्चिम हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS