PMP Drivers | पीएमपीएमएलचा चालकांनी ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईल- हेडफोन वापरल्यास होणार निलंबन!

Homeadministrative

PMP Drivers | पीएमपीएमएलचा चालकांनी ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईल- हेडफोन वापरल्यास होणार निलंबन!

Ganesh Kumar Mule Sep 08, 2025 5:58 PM

GR | Property tax | 40% मिळकत कर सवलतीबाबतचा शासन निर्णय आला | २०१९ पासून ४०% सवलतीच्या रक्कमेची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येऊ नये
Pune Ganeshotsav 2025 | गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शन सहलीचे आयोजन!
PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर

PMP Drivers | पीएमपीएमएलचा चालकांनी ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईल- हेडफोन वापरल्यास होणार निलंबन!

|  बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीएमएलचा कडक निर्णय

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीएमएलने कडक निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलचा चालकांनी ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईल- हेडफोन वापरल्यास  निलंबन करण्याचा इशारा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिला आहे. (PMP Drivers on Mobile)

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तसेच खाजगी बस पुरवठादारांच्या चालक सेवकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संचालक, पीएमपीएमएल यांनी ४ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गंभीर बाब मांडली. काही
चालक मोबाईलवर बोलत किंवा हेडफोनचा वापर करत असताना बस चालवत असल्याचे आढळले आहे. एवढेच नव्हे, तर एका बस चालकाने मोबाईलवर बोलत असताना स्वतःच्या वाहनाला अपघात घडवून आणल्याचा प्रकार त्यांनी अधोरेखित केला. या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी खालील आदेश जारी केले आहेत –

 चालक सेवकांनी ड्युटीवर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल फोन त्या शेड्युलवरील वाहक सेवकाकडे जमा करणे बंधनकारक राहील.
 ड्युटी संपल्यानंतर वाहकाकडून मोबाईल फोन परत करण्यात येईल.
 चालक सेवक ड्युटीवर असताना मोबाईल वा हेडफोन वापरताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.

 आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खाजगी बस पुरवठादारांनाही या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत चालकांनी जबाबदारीने व नियमांचे पालन करून वाहन चालवावे, असे स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: