PMC Standing Committee | अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल स्थायी समितीला सादर करा

Homeadministrative

PMC Standing Committee | अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल स्थायी समितीला सादर करा

Ganesh Kumar Mule Jul 24, 2026 8:16 AM

Vaikunth Smashanbhumi | वैकुंठ स्मशानभूमी  दशक्रिया विधी घाट येथे पत्रा शेड करा  | माजी महापौरांचा आंदोलनाचा इशारा 
PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई
PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

PMC Standing Committee | अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल स्थायी समितीला सादर करा

 

PMC Encroachment Action – (The Karbhari News Service) – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईचा मासिक अहवाल दर महिन्याला स्थायी समितीला सादर करावा असे निर्देश अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज दिले. (Pune PMC News)

भिमाले म्हणाले, “शहरात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला सादर होणाऱ्या अहवालात प्रभागनिहाय आणि दिनांकनिहाय करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील, बजावलेल्या नोटिसा, प्रत्यक्ष झालेली कारवाई तसेच प्रलंबित प्रकरणांची माहिती अनिवार्यपणे समाविष्ट करावी.”

भिमाले पुढे म्हणाले, “कारवाई झालेल्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि बिल्डर यांची माहिती, पाडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाचे क्षेत्रफळ, कारवाईसाठी झालेला एकूण खर्च, कनिष्ठ अभियंत्यांचे अहवाल, प्राप्त तक्रारी आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आकारलेले शुल्क यांचा सविस्तर उल्लेख अहवालात असावा.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: