PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  

HomeBreaking Newsपुणे

PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  

गणेश मुळे Jul 02, 2024 3:17 PM

Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!
Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी 
Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक

Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा निमित्त दोन्ही पालख्यांचा 30 जून ते 2 जुलै  या कालावधीमध्ये पुणे शहरात मुक्काम होता.  30 जून रोजी पालखीचे पुणे शहरात आगमन झाले व महापालिका आयुक्त यांचेमार्फत पालखीचे स्वागत करण्यात आले. 2 जुलै रोजी पालख्यांचे पंढरपूरकरीता प्रस्थान झाले असून पालख्यांचे आगमन व प्रस्थान दरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा, धर्मशाळा, मंदिरे व पालखी मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. पालखी कालावधीमध्ये क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दैनंदिन स्वरूपात शहरात सर्वत्र स्वच्छता विषयक कामे करण्यात आली असून 15 क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 256  टन कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)

घनकचरा विभागाने ही केली कामे

पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात आले.
पुणे शहरात येणा-या वारक-यांच्या सोयीसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार दि. ३०/०६/२०२४ ते ०२/०७/२०२४ अखेर १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार अंदाजे १८४२ पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात आले. तसेच सदरच्या शौचालयांची मनपा
सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली.
• सार्वजनिक रस्त्यावर, वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वच्छता विषयक कामकाजा घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून २६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७५०० किलो
कार्बोलिक पावडर व ११२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर पुरविण्यात आली.
• पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दोनही पालखी मुक्कामास असल्यामुळे व तेथे वारक-यांची संख्या जास्त असल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून दि. ३०/०६/२०२४
०२/०७/२०२४ पर्यंत ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली.

• वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये तीन पाळ्यांमध्ये महिला वारक-यांसाठी शौचालय व न्हाणी घराची सोय करण्यात आली.

२०२४ च्या पालखी दरम्यान सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत महिला वारक-यांकरीता पी एंड जी मार्फत मोफत एकूण ५०००० सॅनिटरी नॅपकीन्स ची वाटप करण्यात आले.

भवानी पेठ कार्यक्षेत्रामध्ये पुणे महानगरपालिका व WRI यांचेमार्फत फूड वेस्ट मनेजमेंटबाबत माहितीपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.

आरोग्यवारीचे योग्य नियोजन

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू / आळंदी / पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. या अनुषंगाने मागील दोन वर्षांपासून ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आरोग्यवारीच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आणि त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

या आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले

१) वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली.
२) मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
३) स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
४) महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
श्री. संत तुकाराम महाराज व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी निमित्त ३० जून २०२४ रोजी निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम स.११.०० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी मा.केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर
मोहोळ, मा. मंत्री महिला व बालविकास श्रीमती अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेल्या शहरातील विविध शाळांमध्ये देखील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले. याठिकाणी महिला हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले व महिला स्त्री रोगतज्ञ व औषध सामुग्री उपलब्ध
करून देण्यात आली. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर साहित्य क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार मुख्य खात्यामार्फत पुरविण्यात आले.