PMC Social Development Department | पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या | ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन
PMC Schemes – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत महिला, पुरुष, दिव्यांग, युवक, तृतीयपंथी अशा सर्वांना विविध लाभ देण्यात येतात. या योजनाचे फायदे घेण्याचे आवाहन महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. असे महापालिकेने म्हटले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना या अंतर्गत शहरातील युवक, युवती, महिला, पुरुष आणि तृतीयपंथी यांच्याकडून विविध योजना साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने जाहीर प्रकटन दिले आहे. (Pune PMC News)
प्रकटनात महापालिकेने म्हटले आहे की, मागासवर्गीय कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाईल. विविध योजना चे अर्ज ८ एप्रिल पासून ३० सप्टेंबर पर्यंत dbt.pmc.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने करता येतील. योजनांच्या अटी आणि शर्ती देखील याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. असे समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच अधिक माहितीसाठी १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
या असतील योजना
लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना
विधवा महिलांना अर्थसहाय्य
कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन पर योजना
माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता अर्थसहाय्य
व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर योजने अंतर्गत गवनी घोषित आणि शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता अर्थसहाय्य
झोपडी दुरुस्ती
वैयक्तिक नळ कनेक्शन
वैयक्तिक वीज जोडणी
वैयक्तिक शौचालय उभारणी
दिव्यांगना स्वयं रोजगारसाठी अर्थसहाय
दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा तांत्रिक कोर्स साठी अर्थसहाय्य
अंध, अपंग, विकलांग, मूकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेण्यासाठी योजना
महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांना अर्थसहाय्य
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
दिव्यांग व्यक्तींनी स्थापन केलेल्या कला पथकास वाद्य खरेदी साठी अर्थसहाय
दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धी साठी अर्थसहाय्य
दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य
कुष्ठपीडीत आणि १००% अतितीव्र अपंग व्यक्तीसाठी वार्षिक अर्थसहाय्य
तृतीयपंथी यांना विविध व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे
तृतीयपंथी यांना स्वयं रोजगार साठी अनुदान देणे
वयोमर्यादा ४५ व त्यापुढील तृतीयपंथी यांना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता दरमहा अर्थसहाय्य देणे
COMMENTS