PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत 619 शिक्षण सेवक पदांसाठी भरती!
शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचालित मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित व इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात जमा होणाऱ्या रक्कमेतून चालविल्या जात असलेल्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षण सेवक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत. मराठी माध्यम एकूण पदे – ३७८, उर्दू माध्यम पदे- ४३ व इंग्रजी माध्यम पदे १९८ संवर्ग निहाय पदाचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. (Pune Municipal Corporation Teacher Recruitment 2024)
संपूर्ण जाहिरातीचा तपशील अधिक माहितीसाठी शासनाच्या https://tait2022.
mahateacherrecruitment.org.in पवित्र पोर्टलवरील या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती / प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहीत कालावधीत नोंदवावा. तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनेप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी. असे आवाहन पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.