PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिका शिक्षण सेवक पद भरती! उद्यापासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

HomeपुणेBreaking News

PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिका शिक्षण सेवक पद भरती! उद्यापासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

गणेश मुळे Mar 04, 2024 6:00 AM

Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार
RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!
8 crores proposed for PMC Futuristic schools and 31.50 crores provision for DBT scheme!

PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिका शिक्षण सेवक पद भरती! उद्यापासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

Pune – (The Karbhari News Service) – PMC Shikshan Sevak Bharti  2024 | पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक भरती TAIT २०२२ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकमध्ये. PAVITRA-TEACHER RECRUITMENT ( Without Interview ) TAIT 2022 General Merit List ( as per TAIT Marks) शिफारस यादी प्राप्त झालेली आहे. त्यामधील अनुक्रमांक ०१ ते २८७ मराठी माध्यम इंग्रजी माध्यम ०१ ते १४० व ०१ ते १४ उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ व स्वाक्षांकित प्रतीसह खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार स्वत: उपस्थित रहावे. असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मंगळवार 5 मार्च  : स. 10 वा – ०१ ते २०० मराठी माध्यम
बुधवार 6 march : स 10 वा  : २०१ ते २८७, मराठी माध्यम, ०१ ते १०० इंग्रजी माध्यम
गुरुवार 7 मार्च  : स 10 वा : १०१ ते १४० इंग्रजी माध्यम, ०१ ते १४ उर्दू माध्यम


स्थळ : कै.वा.ब.गोगटे प्रशाला विद्यानिकेतन शाळा क्र.७, ३१८, नारायण पेठ, पुणे- 411030  (जवळची खूण मोदी गणपती, प्रभात प्रेस, विजय टॉकीज जवळ)
आपण पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रात नोंदविलेल्या सर्व माहितीची मूळ कागदपत्रे व सोबत देणेत आलेल्या तपासणी सूचीप्रमाणे साक्षांकीत प्रतीसह नियोजित वेळेत स्वतः उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. संबंधित उमेदवार पडताळणी कालवधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्य स्तरावर कळविण्यात येईल. उमेदवाराच्या अनुपस्थिती बाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी. असे शिक्षण विभागानं म्हटलं आहे.
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) प्राथमिक शाळेत शिक्षण सेवक (PMC School Teachers Recruitment) म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विविध माध्यमांच्या शाळेत 619 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचालित मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित व इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात जमा होणाऱ्या रक्कमेतून चालविल्या जात असलेल्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षण सेवक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत. मराठी माध्यम एकूण पदे – ३७८, उर्दू माध्यम पदे- ४३ व इंग्रजी माध्यम पदे १९८ आहेत.

(Pune Municipal Corporation Teacher Recruitment 2024)